मुंबई, दि. 22- राज्यातील विविध जिल्ह्यांतील ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी तारीख निश्चित झाली आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या अशा 114 ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी याबाबत घोषणा केली.
संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात अचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांसाठी 4 ते 8 सप्टेंबर 2017 या कालावधीत सुट्टीचा दिवस वगळून नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. 13 सप्टेंबर 2017 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. 23 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. गडचिरोली जिल्ह्यात मात्र दुपारी 3.00 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. यानंतर सर्व ठिकाणची मतमोजणी 25 सप्टेंबर 2017 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.
कोणत्या ग्राामपंचायतींमध्ये होणार मतदान- निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: पालघर- 8, नाशिक- 22, नंदुरबार- 1, अहमदनगर- 8, पुणे- 1, औरंगाबाद- 4, नांदेड- 4, उस्मानाबाद- 1, जालना- 40, हिंगोली- 13, यवतमाळ- 7, चंद्रपूर- 4 आणि गडचिरोली- 1. एकूण- 114.