मुंबई - राज्यात पहिल्या टप्प्यातील सात लकसभा मतदारसंघात ११ एप्रिलला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याच राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितल. निवडणूक तयारीची माहिती देण्यासाठी मंत्रालयात आयिजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सात मतदारसंघातून एकूण ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात वर्धा १४, रामटेक १६, नागपूर ३०, भंडारा गोंदिया १४, गडचिरोली ५, चंद्रपूर १३ तर यवतमाळ मरदारसंघातील २४ उमेदवारांचा समावेश आहे. दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचारी आणि इतर साधनांची ने-आण करण्यासाठी यंदा तीन हेलिकाॅप्टरचा वापर करण्यात येणार असल्याचही दिलीप शिंदे यांनी सांगितले.आचारसंहिता भंगाबाबत तक्रारीसाठी निवडणूक आयोगान सी व्हिजिल अॅप तयार केल आहे. या अॅपला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत २५२७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील १४९३ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्या. त्यांची चौकशी होऊन कारवाई करण्यात आल्याचे दिलीप शिंदे यांनी यावेळी सांगितलं. सी व्हिजिल अॅपवरील तक्रारींवर १०० मिनिटांत कार्यवाही केली जाते, असंही शिंदे यांनी यावेळी सांगितले. राज्यभर आतापर्यंत ९७ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचही शिंदे यांनी यावेळी सांगितल. यात ३० कोटींची रोख रक्कम, १७ कोटींची दारू, ४.६१ कोटींचे ड्रग्ज् आणि ४४ कोटी रकमेच्या सोनेचांदीचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यातील सात मतदारसंघांसाठी ११६ उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 6:54 PM