ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - २०१६च्या पहिल्या ३ महिन्यात दुष्काळाची तिव्रता आधिक भीषण झाली असून या दरम्यान शेतकऱ्यांचे आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. या ३ महिन्यात नापिकीमुळे ११६ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये देशभरात सर्वाधिक जास्त आत्महत्याचे प्रमाण महाराष्ट्रातआहे, त्यानंतर पंजाब व तेलंगणा राज्यांमध्ये झाल्याची माहिती संसदेत देण्यात आली आहे.
नापिकीमुळेच गेल्या वर्षी म्हणजेच २०१५ मध्ये २,००० शेतक-यांनी आत्महत्या केली होती. त्यामध्ये एकट्या महाराष्ट्रात १,८४१ शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.
गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रात ५७ शेतक-यांनी आत्महत्या केली.तर पंजाबमध्ये ५६ आणि तेलंगणमध्ये तीन शेतमजूरांनी आत्महत्या केली असल्याची माहिती रेकॉर्डला असल्याचे केंद्रीय कृषी राज्य मंत्री मोहनभाई कुंदरिया यांनी लोकसभेत सांगितले.
देशातील अनेक राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती ओढावली असून यामध्ये कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, तेलंगण, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, झारखंड आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.