शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
3
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
4
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
5
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
6
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
7
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
8
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
9
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
10
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
11
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
12
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
13
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
14
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
16
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
17
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
18
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
19
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
20
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 5:26 AM

निर्यात बंदीमुळे नुकसान : जगातील  ६० पेक्षा जास्त देशांमध्ये भारतातून कांदा निर्यात केला जातो. त्यात महाराष्ट्राचा वाटा ४० टक्के असतो.

योगेश बिडवई/नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/नवी मुंबई : केंद्र सरकारने लादलेल्या कांदा निर्यातीवरील बंदीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रातील ६ लाख ९४ हजार ९२९ मेट्रि्क टन कांदा निर्यात कमी झाली असून, राज्याचे १,१७३ कोटींचे नुकसान झाले आहे. निर्यातबंदीमुळे देशांतर्गत भाव निम्म्यावर आल्यामुळे शेतकऱ्यांना या वर्षातील दोन हंगामात प्रतिएकरी तीन लाखांचा फटका सहन करावा लागला आहे.   

जगातील  ६० पेक्षा जास्त देशांमध्ये भारतातून कांदा निर्यात केला जातो. त्यात महाराष्ट्राचा वाटा ४० टक्के असतो. नाशिक जिल्हा देशातील कांद्याचे आगर समजला जातो. 

मात्र, वारंवार होणाऱ्या निर्यातबंदीचा व्यापाराला मोठा फटका बसत आहे.    निर्यातीमध्ये दुप्पट वाढ झाल्याने स्थानिक बाजारपेठेतही कांद्याला चांगला भाव मिळू लागला होता; परंतु २०२३-२४ या वर्षात आधी निर्यातीवर शुल्क लावणे, तसेच निर्यातबंदी केल्यामुळे वर्षभरात निर्यात घटून १,८७५ कोटींवर आली.   गतवर्षीच्या तुलनेत राज्याची निर्यातीमधील उलाढाल १,१०० कोटींनी कमी झाली.  

देशातील निर्यातीची स्थितीवर्ष    निर्यात (टन)    किंमत (कोटी)२०२०-२१    १५,७८,०१६    २,८२६२०२१-२२     १५,३७,४९६    ३,४३२२०२२-२३    २५,२५,२५८    ४,५२२२०२३-२४     १७,०७,९९८    ३,८७३

राज्यातून किती झाली निर्यातवर्ष    निर्यात (टन)    किंमत (कोटी)२०२०-२१    ७९८९९२    १,५२०२०२१-२२    ५,७९,०६४    १,४०१२०२२-२३    १४,४५,१७३    २,८४८२०२३-२४    ७,५०,२४४    १,६७५ 

देशाचे ६४९ कोटींचे नुकसानnजगातील सर्वांत मोठा कांदा उत्पादक देश म्हणून भारताची ओळख आहे. मात्र, वर्षभरात देशातून ८ लाख १७ हजार टन कांदा निर्यात कमी झाली असून, त्यामुळे तब्बल ६४९ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. कांदा निर्यातबंदीमुळे मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात या राज्यांतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचेही आर्थिक नुकसान झाले आहे.

कांदा निर्यातीवर वारंवार निर्बंध टाकल्यामुळे निर्यात कमी झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत भाव कोसळून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने निर्यात कायम खुली करणे आवश्यक आहे.- अनिल घनवट, राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी