शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
5
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
6
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
7
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
8
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
9
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
10
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
11
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
12
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
14
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
15
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
16
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
17
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
18
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
19
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
20
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती

अकरावीच्या ११ हजार ८३० विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

By admin | Published: July 29, 2016 8:09 PM

अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ६० हजार ७९४ विद्यार्थ्यांना मेसेज पाठवले होते

आॅनलाईन नोंदणीला आजपासून पुन्हा सुरूवातमुंबई : अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ६० हजार ७९४ विद्यार्थ्यांना मेसेज पाठवले होते. त्यांपैकी एकूण ११ हजार ८३० विद्यार्थ्यांनी बुधवार व गुरूवार या दोन दिवसांत महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला आहे. तर अर्धवट नोंदणी अर्ज भरलेल्याविद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन नोंदणी अर्ज करण्यास शनिवारी, ३० जुलैपासून सुरूवात होत आहे.

अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत अर्धवट नोंदणी अर्ज भरलेले आणि अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी शनिवारपासून आॅनलाईन नोंदणीला पुन्हा सुरूवात आहे. याआधी यशस्वीरित्या अर्ज भरलेल्या आणि महाविद्यालयांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या फेरीत नोंदणी करता येणार नाही. केवळ नोंदणी अर्ज अर्धवट भरलेल्या आणि याआधी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांनाच या फेरीचा फायदा होणार आहे. ३० जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरून नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे.

या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ४ आॅगस्टला गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, त्यांना ९ आॅगस्ट रोजी नव्याने नोंदणी करण्याची संधी आहे. दरम्यान, चारही गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतरही प्रवेशास मुकलेल्या विद्यार्थ्यांना बुधवार आणि गुरूवारी प्रवेशाची आणखी एक संधी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली होती. त्यासाठी गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतरही प्रवेशास मुकलेल्या ७० हजार विद्यार्थ्यांपैकी ६० हजार ७९४ विद्यार्थ्यांना प्रशासनाने मेसेज पाठवत रिक्त जागेवर प्रवेशाची संधी दिली.

मात्र प्रवेश मिळालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी केवळ ११ हजार ८३० विद्यार्थ्यांनीच महाविद्यालयात प्रवेश निश्चित केलेला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या फेरीत प्रवेश घेता आला नाही, त्यांनी ९ आॅगस्ट रोजी पार पडणाऱ्या पहिल्या विशेष फेरीत नव्याने नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. संबंधित विद्यार्थ्यांना विशेष फेरीमध्ये प्रवेशाची आणखी एक संधी उपलब्ध आहे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.................................................मुंबई महानगर क्षेत्रातील महाविद्यालयांतील अकरावीच्याय वर्गात आॅनलाईन प्रवेश घेण्यासाठी आत्तापर्यंत चार गुणवत्ता यादी जाहीर झाल्या आहेत. तर नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी बुधवार व गुरूवारी पाचवी विशेष फेरी राबवण्यात आली. अशाप्रकारे पार पडलेल्या पाच फेऱ्यांमध्ये एकूण १ लाख २३ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश निश्चित केलेलेआहेत................................मेसेज आल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश निश्चित केलेल्या नॉट रिपोर्टेडविद्यार्थ्यांची आकडेवारी -बोर्ड विद्यार्थीएसएससी ११,२५९सीबीएसई २११आयसीएसई २४८आयबी ०आयजीसीएसई ३१एनआयओएस २२इतर ५९.................................................एकूण ११,८३०