ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. १ - उस्मानाबाद जिल्ह्यात अनसुरडा गावात दलित-सवर्ण वाद चिघळून ग्रामस्थांनी दलित वस्तीवर हल्ला करत १२ -१३ जणांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एक नागरिक गंभीर जखमी झाला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून अनसुरडा गावाता दलित व सवर्णांदरम्यान वाद सुरू आहे. याआधी दलितांवर बहिष्कारही टाकम्यात आला होता, मात्र प्रशानातील अधिका-यांनी दोन्ही समाजात सलोखा निर्माण केला.
पण काल हा वाद पुन्हा चिघळला आणि सवर्णांनी दलित वस्तीवर हल्ला करत त्यांना मारहाण केली. १२-१३ जखमींना उपचारांसाठी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात करण्यात आले असून एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे.