मुंबई : मुंबईतील उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील १२ आरोपींना विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरविले, तर पुराव्यांअभावी एका आरोपीची निर्दोष सुटका केली. दोषी आरोपींना काय शिक्षा ठोठवावी, यावर येत्या सोमवारपासून युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर न्यायालय या आरोपींची शिक्षा जाहीर करेल. मुंबईतील उपनगरी पश्चिम रेल्वे गाड्यांच्या प्रथम वर्गाच्या डब्यात ११ जुलै २००६ रोजी एकापाठोपाठ एक असे बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटांत १८८ जणांचा बळी गेला होता, तर ८२९ जण जखमी झाले होते. याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर याची सुनावणीही सुरू झाली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने २००८मध्ये या खटल्याला स्थगिती दिली. २०१०मध्ये ही स्थगिती न्यायालयाने उठवल्यानंतर विशेष न्यायाधीश यतिन शिंदे यांच्यासमोर हा खटला सुरू झाला. या खटल्यात आयपीएस व आयएएस अधिकाऱ्यांचीही साक्ष नोंदवण्यात आली. (प्रतिनिधी)दोषी ...अहमद अन्सारी, डॉ. तन्वीर अन्सारी, मोहम्मद शेख, सिद्दीकी, मोहम्मद शफी, शेख आलम शेख, मोहम्मद अन्सारी, मुझमिल शेख, सोहिल शेख, जमीर शेख, नावेद खान व असिफ खान.
निर्दोष ...अब्दुल शेख एटीएस व गुन्हे शाखेतील वाद... यातील सर्व १३ आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा एटीएसने केला होता. मात्र जबाब देण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आरोपींनी न्यायालयात केला, तर गुन्हे शाखेने २००८ मध्ये आयएमचे अतिरेकी पकडले. २००५ ते २००८ या काळात झालेले बॉम्बस्फोट आयएमनेच केल्याचा दावा गुन्हे शाखेने केला, मात्र यात ७/११ चा उल्लेख नव्हता. त्यामुळे यंत्रणांमध्ये वाद निर्माण झाला.