शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

जगातील १२ कोटी मुले शिक्षणापासून वंचित!

By admin | Published: July 05, 2016 2:04 AM

२०११ पासून शाळेत न जाणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांचे शिक्षण अपूर्ण राहते. जागतिक स्तरावर विचार केल्यास तब्बल १२४ दशलक्ष मुले आजही शाळेपासून वंचित आहेत.

मुंबई : २०११ पासून शाळेत न जाणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांचे शिक्षण अपूर्ण राहते. जागतिक स्तरावर विचार केल्यास तब्बल १२४ दशलक्ष मुले आजही शाळेपासून वंचित आहेत. एवढेच नव्हे, तर यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे प्रति ५ विद्यार्थ्यांपैकी दोन मुले वाचन, लेखन आणि साधे गणितही करू शकत नाहीत. ही चिंताजनक बाब युनिसेफच्या ‘जागतिक मुलांची सद्य:स्थिती’ या अहवालातून समोर आली.युनिसेफने तयार केलेल्या जगातील लहान मुलांची सद्य:स्थिती (द स्टेट आॅफ द वर्ल्ड चिल्ड्रन) या वार्षिक अहवालाचे डिजिटल रूपात प्रकाशन सोमवारी राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे झाले. या वेळी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक, युनिसेफच्या महाराष्ट्राच्या अधिकारी राजेश्वरी चंद्रशेखर तसेच दोन शालेय विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. मराठवाड्यातील दुष्काळाची झळ लहान मुले व महिलांना अधिक प्रमाणात बसली असल्याचे सांगून लहान मुलांच्या तसेच महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने सर्वंकष शाश्वत विकास होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी येथे केले. राज्यातील आणि विशेषत: मुंबईतील स्त्री-पुरुष गुणोत्तर असमान असून तंत्रज्ञानाचा उपयोग स्त्रीभ्रूण हत्येसाठी होतो ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांची स्थिती सुधरविण्यासाठी प्रथम मातेची काळजी घेणे, तिचे पोषण, आहार, प्रसूतीपूर्व तपासणी, प्रसूतीनंतर काळजी इ. गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.बालमृत्यू दर कमी करणे, शाळेतील मुलांची पटनोंदणी वाढविणे व दारिद्र्य निर्मूलन या क्षेत्रांमध्ये देशभरात लक्षणीय प्रगती झाली असली तरीही, पाच वर्षांखालील मुलांचे टाळता येण्याजोगे मृत्यूचे प्रमाण कमी करणे व लहान वयात होणारे विवाह टाळण्यासंदर्भात परिस्थिती सुधारण्यास अजूनही वाव असल्याचे राज्यपालांनी सांगितले. लहान मुलांच्या आरोग्यासाठी राज्य शासनातर्फे केल्या जात असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करताना युनिसेफच्या अहवालाची शासन योग्य दखल घेईल तसेच सर्व मुलांना व्यक्तित्व विकासाची योग्य संधी प्रदान करण्याच्या दृष्टीने पावले उचलेल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. या वेळी राज्यपालांनी राधा शिंदे (अंबड, जालना) व इजाज इस्माईल (कोल्हापूर) या युनिसेफच्या प्रयत्नाने विपरीत परिस्थितीवर मात करून शिक्षण घेत असलेल्या मुलांचे कौतुक केले. (प्रतिनिधी) पाच वर्षांपर्यंतच्या मुलांवर लक्ष केंद्रित करूराज्य शासन गर्भातील बालकांपासून ते पाच वर्षांच्या मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे. माता आणि मुले यांच्या आरोग्य, पोषण, शिक्षण आणि संरक्षण याबाबतच्या गरजा पूर्ण करण्याकरिता विविध पावले उचलत आहे. याकरिता विविध विभागांमध्ये समन्वय साधून माता आणि मुलांबद्दलच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आमचे प्रयत्न अधिक व्यापक करण्याकरिता आम्ही सुरक्षित मातृत्व आणि शिशू पोषण धोरण स्वीकारत आहोत. तसेच राष्ट्रीय ईसीसीई २०१३ धोरणाच्या धर्तीवर राज्याचे ईसीसीई धोरण बनवत आहोत. अशा विविध प्रयत्नांनी माता आणि मुले यांच्या जीवनात दीर्घकालीन चांगले बदल दिसून येतील, असे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय या वेळी म्हणाले.मुलांच्या हितासाठी तत्काळ पाऊले उचलावीत मुलांना सशक्त, सक्षम बनविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुले हे कायम बाल्यावस्थेत राहणे किंवा त्यांचा बौद्धिक विकास न होणे घातक आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी बरेच काही करता येऊ शकते, याची मला खात्री आहे. विशेषत: प्रयोगशीलतेतून बदलत्या वातावरणात आपोआपच बदल होऊ शकतो. एवढेच नव्हे, तर त्याचे दीर्घकालीन परिणामही दिसून येतात. यासाठी प्रत्येक मुलाला चांगले जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असे महाराष्ट्र युनिसेफच्या क्षेत्रीय कार्यालय प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर यांनी सांगितले.