शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
4
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
5
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
6
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
7
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
8
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
9
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
11
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
13
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
14
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
15
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
16
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
18
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
19
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

लोणावळ्यात 12 दिवसात बाराशे मिमी पाऊस; शहरात जोर कायम 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 3:12 PM

पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या लोणावळा शहरात मागील बारा दिवसात 1246 मिमी (49.6 इंच) ऐवढ्या पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर आजही कायम असल्याने परिसरातील ओढे नाले नदीपात्र दुथडी भरुन वाहू लागले आहे.

लोणावळा : पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या लोणावळा शहरात मागील बारा दिवसात 1246 मिमी (49.6 इंच) ऐवढ्या पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर आजही कायम असल्याने परिसरातील ओढे नाले नदीपात्र दुथडी भरुन वाहू लागले आहे. मागील दीड आठवड्यापासून परिसरात संततधार पाऊस सुरु असल्याने वलवण, शिरोता, पवना, आंद्रा, वाडिवळे ही मावलक तालुक्यासह पिंपरी चिंचवड परिसराला पाणी पुरवठा करणारी धरणे पंन्नास टक्क्यांच्या पुढे गेली आहे. लोणावळा धरणातून देखील खोपोली विज निर्मीती केंद्राला मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे.      जूनच्या संपूर्ण महिन्यात केवळ 737 मिमी (29 इंच) असलेला पाऊस पंधरा दिवसात 2106 मिमीवर (83 इंच) गेला आहे. शहरात दररोज सरासरी चार इंच पाऊस होत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी पहायला मिळत आहे. वाकसई, कार्ला, वेहेरगाव परिसरात नव्याने होती असलेली बांधकामे व रस्त्याच्या लगत करण्यात आलेले भराव यामुळे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बंद झाल्याने भातशेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या संततधार कोसळणार्‍या पावसात देखिल वर्षाविहाराचा आनंद घेण्याकरिता शनिवार व रविवारच्या सुट्टी निमित्त हजारोंच्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल झाल्याने सर्वत्र मोठी वाहतुक कोंडी झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावर गवळीवाडा नाका परिसरात चालणे देखिल मुश्किल होत आहे,  हीच परिस्थिती भुशी गाव ते भुशी धरण परिसरात आहे. वाहतुक कोंडी सोडविण्याकरिता मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून धरणाकडून येणारी वाहने रायवुड मार्गे जुनाखंडाळा येथे बाहेर काढण्यात आली आहेत.

टॅग्स :lonavalaलोणावळाRainपाऊस