शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

द्रुतगती मार्गावर १२ किमीचा बोगदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2016 4:09 AM

अपघात रोखण्यासाठी संपूर्ण महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएम सिस्टिम) उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला

मुंबई : मुंबई-पुणे दु्तगती महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी संपूर्ण महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएम सिस्टिम) उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून अपघात रोखण्यासाठी ब्रिफेन वायरचा वापर करण्यात येणार आहे. तसेच खालापूर ते ‘सिंहगड’ असा १२ किलोमीटरचा बोगदा उभारण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. एक्प्रेस वे वर होणारे अपघात आणि त्यावरील उपाययोजनांसंदर्भात अजित पवार, सुभाष पाटील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह तब्बल ४१ सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी यावेळी अनेक प्रश्न उपस्थित करीत हा महामार्ग मृत्यूचा सापळा झाला असल्याची टीकाही केली. मंत्री शिंदे यांनी सांगितले की, दरडी कोसळण्याचे प्रकार पुन्हा होऊ नयेत, यासाठी एमएसआरडीसीने आयआयटीच्या सल्ल्यानुसार युद्धपातळीवर काम केले आहे. आयटीएम सिस्टिम उभारण्याचा निर्णय अलिकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. या अंतर्गत कंट्रोल अँड कमांड सेंटरसह सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. याबाबत गृहविभाग प्रस्ताव तयार करत आहे. या इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिममध्ये स्पीड मॉनिटरिंग, लेन कटिंगवर नियंत्रण, आॅटोमॅटिक व्हेईकल नंबर डिटेक्शन, नाईट व्हिजन, चलान इत्यादी यंत्रणांचा समावेश असेल. (विशेष प्रतिनिधी)>ट्रॉमा सेंटरला ‘सिद्धीविनायक’ची मदतओझर्डे येथे एमएसआरडीसीच्या माध्यमातून उभारण्यात आलेले ट्रॉमा सेंटर १६ जून रोजी एमएसआरडीसीच्या ताब्यात आले असून सिद्धीविनायक ट्रस्ट या केअर सेंटरसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री पुरवणार आहे. त्यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत ते लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, अशी घोषणाही शिंदे यांनी केली.सेव्ह लाइफ फाउंडेशन या संस्थेसह एमएसआरडीसीने झीरो फॅटेलिटी कॉरिडॉरच्या संदर्भात सामंजस्य करार केला असून या संस्थेने सुचवलेल्या उपाययोजना राबवण्याची प्रक्रि याही सुरू करण्यात येणार आहे. एक्स्प्रेस वे च्या टोलनाक्यांवर वाहनचालकांना ताटकळावे लागू नये यासाठी सी लिंकच्या धर्तीवर इंटेल सिस्टिम सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. >अशा असतील उपाययोजनामहामार्गावर सध्या १४ किमीच्या पट्टयात ब्रिफेन वायर बसवण्यात आल्या असून २५ किमीच्या पट्टयात ब्रिफेन वायर बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे उर्वरित पट्टयातदेखील ब्रिफेन वायर बसवण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येईल. गेल्या वर्षी पावसाळ्यात महामार्गावर दरडी कोसळण्याचे प्रकार घडले होते. त्यानंतर एमएसआरडीसीने तातडीने हालचाली करून आयआयटी तसेच जिआॅलॉजिकल सर्व्हेआॅफ इंडियाच्या मदतीने अतिसंवेदनशील जागांवर युद्धपातळीवर हायटेन्साइल वायर रोप्सच्या सेफ्टी नेट्स, ८ ते १२ मीटर खोलीपर्यंत रॉकबोल्टिंग आदी उपाययोजना केल्या आहेत. त्यानंतर आयआयटी मार्फत पुन्हा सर्वेक्षण करून त्यांनी सुचवलेल्या नव्या जागांवर देखील लवकरच काम सुरू करण्यात येत आहे, असेही शिंदे म्हणाले.।लेन कटिंगवर कठोर कारवाई या महामार्गावर ओव्हरस्पीडिंग, लेन कटिंग आणि ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी नेहमीच्या पोलिसांबरोबरच डेल्टा फोर्सच्या १०० जणांचे कृती दल उभे केले जाणार असून त्यांना विशेष पोलिस अधिकाऱ्यांचा दर्जा दिला जाईल. खालापूर ते ‘सिंहगड’ असा १२ किलोमीटरचा बोगदा उभारण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.