शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

सिंचनासाठी १२ हजार कोटींचे कर्ज

By admin | Published: April 13, 2016 1:58 AM

राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात केलेली ८ हजार कोटी रुपयांची तरतूद अपुरी असून, आणखी १२ हजार कोटी रुपयांची तरतूद कर्ज घेऊन करण्यात येईल, तसेच

मुंबई : राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात केलेली ८ हजार कोटी रुपयांची तरतूद अपुरी असून, आणखी १२ हजार कोटी रुपयांची तरतूद कर्ज घेऊन करण्यात येईल, तसेच ७० हजार कोटी रुपयांची अपूर्ण कामे येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्यासाठीही कर्ज काढले जाईल, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत सांगितले. मराठवाड्यावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, ‘यंदा राज्यातील २७ सिंचन प्रकल्प पूर्ण करून, त्याद्वारे १ लाख ६० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली जाईल. गेल्या वर्षी २८ प्रकल्प पूर्ण करून ४४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली गेली. यंदा १२ हजार कोटींची अतिरिक्त तरतूद आणि त्यानंतरच्या प्रत्येक वर्षांत २० हजार कोटी रुपयांची तरतूद व कर्जाद्वारे करून सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी अनुमती दिली आहे.’ मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात धरणांमधील पाण्याचे समन्यायी वाटप करण्याची जोरदार मागणी प्रशांत बंब, मधुकरराव चव्हाण, अब्दुल सत्तार, जयप्रकाश मुंदडा, जयदत्त क्षीरसागर, अमित देशमुख आदी सदस्यांनी या वेळी केली. मात्र, या सूचनेवर विचार करू, एवढेच आश्वासन महाजन यांनी दिले. या मागणीवर सर्वपक्षीय सदस्य संतप्त झालेले असताना, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र, समन्यायी वाटपाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगितले. सिंचनाबाबत राज्याचे नियोजन आजवर चुकत गेले. आपल्या मतदारसंघात, आपल्या शेताजवळ धरण करण्याचा संकुचित विचार झाला. त्यातून जायकवाडीच्या डोक्यावर धरणे उभी राहिली. सोलापूर जिल्ह्याला दोन टीएमसी पाणी सोडण्यासाठी दहा टीएमसी पाणी सोडावे लागते. कारण वेगवेगळ्या कारणाने पाण्याची गळती होते, असे महाजन म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)मराठवाड्याचा अनुशेष नाही; मंत्र्यांच्या विधानाने सदस्य संतप्तनिदेशांक व अनुशेष निर्मूलन समितीने दर्शविलेला सिंचनाचा भौतिक अनुशेष आज मराठवाड्यात शिल्लक नसल्याचे विधान मंत्री महाजन यांनी करताच, दोन्ही बाजूंचे मराठवाड्यातील सदस्य आक्रमक झाले. हा मराठवाड्यावरील अन्याय असल्याचे त्यांचे म्हणणे होते.अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनीही मंत्र्यांच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली. आपली माहिती योग्यच आहे. मात्र, मराठवाड्याला सिंचन निधीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे व ती पूर्ण केली जाईल, असे महाजन म्हणाले. ‘उपसा’चे बिल सरकार भरणारदुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील उपसा सिंचन योजनांचे शेतकऱ्यांचे बिल हे यंदाच्या वर्षी राज्य सरकार भरेल, अशी घोषणा मदत व पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे यांनी या वेळी केली. सहकारी पाणीवापर संस्थांकडून या योजना चालविल्या जातात. पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनीही चर्चेला उत्तर दिले.