शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पोलिसांची १२ हजारांवर पदे रिक्त !

By admin | Published: August 17, 2015 12:56 AM

राज्य पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत आहेत. मात्र दुसरीकडे प्रत्यक्षात मंजूर असलेली पदे भरण्याकडे गृहविभागाचे

जमीर काझी, मुंबईराज्य पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत आहेत. मात्र दुसरीकडे प्रत्यक्षात मंजूर असलेली पदे भरण्याकडे गृहविभागाचे दुर्लक्ष असल्याचे उपलब्ध मनुष्यबळावरुन स्पष्ट होत आहे. राज्यातील ११ कोटींहून अधिक जनतेच्या संरक्षण आणि कायदा व सुव्यस्थेसाठी दोन लाखांवर पोलिसांचा फौजफाटा मंजूर आहे. मात्र पैकी तब्बल १२ हजार २८ पदे रिक्त आहेत. ही संख्या प्रत्यक्ष तपासकाम व बंदोबस्तासाठी असलेल्यांची असून त्याशिवाय तांत्रिक विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजारावर पदेही भरण्यात आलेली नाहीत. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अधिकाराबाबतच्या धोरणांची गेल्या वर्षापासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. तरी देखील प्रत्यक्षात गृह विभागाचा कारभार पूर्वीप्रमाणचे ‘सोयीनुसार’ सुरु असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. रखडलेल्या बढती आणि रिक्तपदे भरण्याला कधी ‘मुहूर्त’ मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यापार्श्वभूमीवर उपलब्ध मनुष्यबळाबाबत आढाव्यासाठी ३१ जुलैपर्यंतची आकडेवारी ‘लोकमत’ला उपलब्ध झाली आहे. पोलीस महासंचालक (डीजीपी) पासून कॉन्स्टेबलपर्यंत विविध १३ दर्जाची पदे आहेत. पैकी डीजी वगळता एकूण वरिष्ठ दर्जाच्या १९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या जागा भरलेल्या नाहीत. त्यामध्ये अप्पर महासंचालकांची ३० पैकी २६ पदे भरलेली आहेत. विशेष महानिरीक्षक ४२ पैकी ३७ जागा तर उपमहानिरीक्षकाच्या ३६ पैकी २८ तर उपायुक्त/ अधीक्षकाच्या २६६ पैकी २३३ पदावर अधिकारी कार्यरत आहेत. नि:शस्त्र विभागातील एसीपी/डीवायएसपीच्या ६८६ पदे मंजूर असून तेथे ४८२ अधिकारी आहेत. हत्यारी, बिनतारी संदेश, परिवहन व श्वान पथकातील सहाय्यक आयुक्तांची मिळून एकूण १३६ पदे असताना केवळ ५५ अधिकारी कार्यरत आहेत. विविध विभागातील निरीक्षक दर्जाच्या ३४६६पैकी ३४१४ जागा भरल्या आहेत. एपीआयच्या ४४४७ पैकी केवळ ३९४७ कार्यरत आहेत. तर पीएसआयचे देखील ९६८७ पैकी ५०० पदे रिक्त आहेत. काही गुन्ह्याच्या तपास कामाचे अधिकार असलेल्या सहाय्यक फौजदार व हवालदाराची अनुक्रमे १८ हजार ८०४ व ४२ हजार९६४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १७,४१८ व ४०,१४९ जागाच भरण्यात आल्या आहेत. नाईक व शिपाईसाठी अनुक्रमे ४१ हजार ४३५ व ९६ हजार २४० जागा आहेत. त्यापैकी फक्त ३७ हजार ६०० व ९२ हजार ४०२ पोलीस कार्यरत आहेत.