शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

१२५ शहरे २ आॅक्टोबरपर्यंत हागणदारीमुक्त

By admin | Published: August 25, 2016 5:29 AM

२ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील 125 शहरे हागणदारी मुक्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुंबई : ‘अमृत मिशन’साठी राज्यातील ४४ शहरांची निवड करण्यात आली असून या शहरांमध्ये सुरु असलेली कामे मिशन मोडवर पूर्ण करण्याबरोबरच येत्या २ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील 125 शहरे हागणदारी मुक्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.अमृत मिशन, स्मार्ट शहरे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान आदींचा आढावा फडणवीस यांनी आज मंत्रालयात घेतला. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पुणे आणि सोलापूरसाठी २७९ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. अमृत मिशनसाठी राज्यातील ४४ शहरांची निवड करण्यात आली असून या शहरांमध्ये राज्यातील ७६ टक्के नागरी वस्ती आहे. सॅपमधून राज्यात येत्या तीन वर्षांत ७ हजार २२७ कोटी रु पयांची कामे प्रस्तावित आहेत. यामध्ये केंद्र शासन ३६०० कोटी रु पये, राज्य शासन १८०० कोटी रु पये तर संबंधित शहरे १८०० कोटी रु पये उपलब्ध करु न देणार आहे. यंदा १ हजार ९८९ कोटी रुपयांचे २२ प्रकल्प सुरू होतील. त्यात अचलपूर, यवतमाळ, वर्धा, उस्मानाबाद, मालेगांव, सातारा, सोलापूर, इचलकरंजी, हिंगणघाट, अमरावती, लातूर, जळगांव अहमदनगर, वसई-विरार, अंबरनाथ, पनवेल, कुळगाव-बदलापूर, पिंपरी चिंचवड या शहरातील पाणीपुरवठयाचे २१ तर उल्हासनगर येथील घनकचऱ्याच्या एका प्रकल्पाचा समावेश आहे. पुढील वर्षी २४८९ कोटी रु पयांचे २५ प्रकल्प राबविणार असून त्यामध्ये पाणी पुरवठयाचे १४ तर घनकचऱ्याचे १० व सांडपाण्याचा पुनर्वापराचा एक प्रकल्प आहे. त्यानंतरच्या वर्षी २७४८ कोटी रु पयांचे प्रकल्प करण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)>गेल्या १० वर्षापासून सुरु असलेले ८११० कोटी रु पयांच्या १४० प्रकल्पापैकी ५५ प्रकल्प २०१६-१७ मध्ये पूर्ण करण्यात येतील. त्यामध्ये चंद्रपूर, परभणी, कोल्हापूर, इचलकरंजी, सावनेर, पुसद, औरंगाबाद, अमरावती येथील प्रकल्पांचा समावेश आहे. तर उर्वरित ८५ प्रकल्प २०१७-१८ मध्ये पूर्ण करण्यात येणार आहेत.स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यात १.८७ लाख शौचालये बांधण्यात आली आहेत. त्यात सर्वाधिक १२९८२ शौचालये पुणे महापालिकेने बांधल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तेथील महापालिका आयुक्तांचे अभिनंदन केले.