शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीला, तर दहावीची 3 मार्चपासून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 8:03 PM

दहावी तसेच बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर कऱण्यात आल्या असून बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीला तर दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरु हाेणार आहेत.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2020 मध्ये घेतल्या जाणा-या दहावी - बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा येत्या 18 फेब्रुवारीपासून तर दहावीची लेखी परीक्षा येत्या 3 मार्च पासून घेतली जाणार आहे,असे राज्य मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

राज्य मंडळातर्फे पुणे,नागपूर,औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर, व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे या उद्देशाने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिध्द केले जाते.त्यानुसार 15 आॅक्टोबर रोजी राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.

इयत्ता बारावीची परीक्षा येत्या 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत घेतल्या जाणार आहेत.तर दहावीची परीक्षा येत्या 3 मार्च ते 23 मार्च या कालवधीत घेतली जाईल.मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकाची सुविधा केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळांकडे छापील स्वरूपातील देण्यात येणारे वेळापत्रकच अंतिम असणार आहे.त्यामुळे छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व त्यानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. त्याचप्रमाणे अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले.तसेच व्हॅट्सअ‍ॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक गृहित धरू नका,असे मंडळाचे सचिव डॉ.अशोक्ल भोसले यांनी सांगितले.

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना कळविले जाईल. तसेच लेखी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत काही सुचना, हरकती असल्यास संबंधित विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे 15 दिवसांच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. त्यानंतर प्राप्त होणा-या सूचनांचा विचार केला जाणार नाही,असेही मंडळाचे सचिव अशोक भोसले म्हणाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रexamपरीक्षाMaharashtra Education Boardमहाराष्ट्र शिक्षण मंडळ