संतोष मिठारी- कोल्हापूर --शिवाजी विद्यापीठाच्या बाराव्या कुलगुरुपदी विज्ञान (सायन्स) विद्याशाखेमधील प्राध्यापकाची वर्णी लागणार आहे. या पदासाठी अंतिम मुलाखती झाली. त्यातून पात्र ठरलेले पाच प्राध्यापक हे ‘विज्ञान’शी संबंधित आहेत. निवड प्रक्रियेतील बदलामुळे विज्ञान शाखेतील प्राध्यापकाला कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. ‘नॅक’चे ‘अ’ मानांकन मिळविणाऱ्या आणि स्थापनेची ५० वर्षे पूर्ण करणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या अंतिम शर्यतीत असलेल्या प्राध्यापकांचे मूळ गाव, त्यांचे शिक्षण आणि सध्या ते कोणत्या पदावर कार्यरत आहेत, याचा ‘लोकमत’ने आढावा घेतला आहे. यात अंतिम मुलाखती दिलेले पाचही प्राध्यापक विज्ञान शाखेतील आहेत. प्रा. के. बी. पवार यांची १९८६ मध्ये विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती झाली. त्यांच्या माध्यमातून विज्ञान शाखेतील पहिल्या प्राध्यापकाला कुलगुरुपदासाठी संधी मिळाली. त्यानंतर आतापर्यंत झालेल्या पाच कुलगुरूंपैकी चार कुलगुरू हे विज्ञान शाखेशी संबंधित होते. सन २०१५-२०२० या पाच वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्त होणारे नवीन कुलगुरू हे विद्यापीठाचे बारावे कुलगुरू असणार असून, तेदेखील विज्ञान शाखेतील असणार आहेत. दरम्यान, विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी गेल्या पाच दिवसांपूर्वी राजभवनात कुलपती सी. विद्यासागर राव यांनी अंतिम मुलाखती घेतल्या आहेत. यात शिवाजी विद्यापीठातील डॉ. एस. पी. गोविंदवार, सोलापूरचे डॉ. एल. पी. देशमुख, पुण्यातील डॉ. नितीन करमळकर, औरंगाबादमधील डॉ. देवानंद शिंदे आणि नांदेडमधील डॉ. नामदेव कल्याणकर यांचा समावेश आहे. कुलगुरुपदासाठी अंतिम मुलाखती पूर्ण होऊन सहा दिवस झाले आहेत. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागली आहे, याच्या घोषणेची अनेकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.विज्ञान शाखेशी संबंधित विद्यापीठाचे कुलगुरू* प्रा. के. बी. पवार* डॉ. ए. टी. वरुटे* डॉ. एम. जी. ताकवले* डॉ. माणिकराव साळुंखे* डॉ. एन. जे. पवारविज्ञान शाखेशी संबंधित कुलगुरूप्रा. के. बी. पवारडॉ. ए. टी. वरुटेडॉ. एम. जी. ताकवलेडॉ. माणिकराव साळुंखेडॉ. एन. जे. पवार
बारावे कुलगुरू विज्ञान शाखेचेच
By admin | Published: June 12, 2015 11:07 PM