शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

बीएचआरच्या १३ संचालकांना अटक

By admin | Published: May 28, 2016 1:56 AM

आकोट येथील पतसंस्थेतील घोटाळा; ८0 लाखांनी केली होती फसवणूक

आकोट: भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट सहकारी पतसंस्था (बीएचआर) च्या आकोट शाखेतील ठेवीदारांची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी १३ संचालकांना अटक केली. आकोट येथील बीएचआर पतसंस्थेत ठेवीदारांनी ठेवी जमा केल्या होत्या. रकमेवर जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे ठेवीदारांचे म्हणणे होते. ठेवीची मुदत संपल्यावरही मुळ रक्कम, व्याज देण्यास टाळाटाळ करण्यात आली. ठेवीदारांनी ठेवी परत मिळण्यासाठी पतसंस्थेचे उंबरठे झिजवले. अखेर जुलै २0१५ मध्ये आकोट शहर पोलीस ठाण्यात पतसंस्थेच्या १९ संचालकांसह शाखा अधिकार्‍याविरुद्ध भादंविच्या कलम ४२0, ४0६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आकोटातील ठेवीदारांची फसवणूकआकोट शहरासह परिसरातील ग्राहकांचे तब्बल ८0 लाख रुपये पतसंस्थेमध्ये अडकून पडले आहेत, अशी माहिती सीआयडीचे उपअधीक्षक गजानन शेळके यांनी दिली. आरोपींना जळगाव येथून घेतले ताब्यातघोटाळाप्रकरणी सीआयडीने १३ संचालकांच्या अटकेचा आदेश प्राप्त केला. त्यानंतर आरोपींना जळगाव येथील जिल्हा कारागृहातून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये प्रमोद रायसोनी, दिलीप चोरडिया, मोतीलाल जिरी, सूरजमल जैन, दादा पाटील, भगवान माळी, राजाराम कोळी, भागवान वाघ, डॉ. हितेंद्र महाजन, इंद्रकुमार लालवानी, सुखलाल माळी, यशवंत जिरी यांचा समावेश आहे. सोमवापर्यंत पोलीस कोठडीसीआयडीने आरोपींना गुरुवारी मध्यरात्री अकोल्यात आणले. त्यानंतर त्यांना शुक्रवारी आकोट येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपींना ३0 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अँड. रेलकर यांनी काम पाहिले. ५४ ठिकाणी गुन्ह्यांची नोंद भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यालय जळगाव येथे असून, राज्यभरात अनेक ठिकाणी शाखा आहेत. या शाखांमध्ये मोठय़ा संख्येने ग्राहकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. मुदत संपल्यानंतरही ग्राहकांना पैसे परत मिळत नसल्याने व बँकेचे व्यवहार डबघाईस आल्याने राज्यभरात ५४ ठिकाणी फसवणुकीसंदर्भात गुन्हे दाखल झाले आहेत.