शहरं
Join us  
Trending Stories
1
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
2
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
3
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
4
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
5
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
6
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
7
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
8
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
9
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
10
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
11
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
12
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
13
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
15
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
16
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
17
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
19
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
20
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 

१३ डॉक्टरांचे राजीनामे

By admin | Published: May 29, 2015 1:20 AM

गेल्या महिन्यात येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षकांसह तेरा डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.

पंढरपूर : रुग्णालयामध्ये आवश्यक साधनसामुग्री दिली जात नाही, डॉक्टरांची संख्या अतिशय कमी असून रिक्त पदे भरली जात नाहीत अशा अनेक कारणांसाठी गेल्या महिन्यात येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षकांसह तेरा डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. या समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी गुरुवारी या तेरा डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले. परंतु, या संपाचा फटका रुग्णांना बसू नये यासाठी प्रशासनाने तातडीने पर्यायी डॉक्टरांची सोय केली होती.उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या अनेक वर्षापासून तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत. त्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज गायकवाड यांनी जिल्हा रुग्णालयाकडे वारंवार मागणी केली. त्या मागण्या पूर्ण न झाल्याने डॉ. गायकवाड यांनी राजीनामा दिला होता. मात्र आश्वासनानंतर त्यांनी तो राजीनामा मागेही घेतला. परंतु, आश्वासने पूर्ण झाली नसल्याने अखेर डॉ. गायकवाड यांच्यासह तेरा डॉक्टरांनी २७ एप्रिल रोजी सामूहिक राजिनामा दिले होते. त्याचीही शासनदरबारी दखल घेतली गेली नाही. त्यामुळे त्यांनी कामबंद आंदोलन केले.डॉक्टरांची संख्या अपुरी असल्याने रुग्णांचे आणि डॉक्टरांचेही हाल होत आहेत. शिवाय काही असंतुष्ट लोकांच्या ‘अर्थपूर्ण’ हस्तक्षेपामुळे आम्हाला राजीनामे द्यावे लागले.- डॉ. पंकज गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर