लोकमत न्यूज नेटवर्कवसई : विवाहविषयक संकेतस्थळावरून बनावट खाते उघडून तेराहून अधिक तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून पंचवीस लाखाहून अधिकचा गंडा घातल्याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी एक ठकसेनाला ठाण्यातून अटक केली आहे.कृष्णा चंद्रसेन देवकाते उर्फ प्रज्वल देशमुख (३०) असे त्याचे नाव असून तो ठाण्यातील पुराणिक सिटीतील रहिवासी आहे. नालासोपाºयातील एका महिलेने शादी डॉट कॉमवरून लग्नाचे आमिष दाखवून देवकातेने फसवणूक केल्याची तक्रार नालासोपारा पोलीस ठाण्यात केली होती. देवकातेने आपण रिलायन्स कंपनीत नोकरीला असून दोन लाख रुपये पगार असल्याची बतावणी करून पिडीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून आठ लाख रुपये उकळले होते. त्यानंतर त्याने तिला टाळायला सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे समजताच तिने तक्रार केली असता त्यानंतर पोलिसांनी देवकातेला ठाणे येथील घरातून अटक केली होती.त्याने किमान तेराहून अधिक तरुणी, घटस्फोटीत, विधवा, पगारदार महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पंचवीस लाखांहून अधिक रुपयांचा गंडा घातल्याचे उजेडात आले आहे. तो शादी डॉट कॉम आणि जीवनसाथी या विवाहविषयक संकेतस्थळावर बनावट खाते उघडून खोटी माहिती देत असे. त्यानंतर नोकरी करणाºया अथवा श्रीमंत महिलेला हेरून तिला लग्नाचे आमिष दाखवीत असे. महिला आपल्या जाळ््यात आल्यानंतर तो अनेक कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे अथवा दागिने उकळीत असे. अशा रीतीने त्याने तेराहून अधिक महिलांची फसवणूक झाल्याची माहिती उजेडात आली.
लग्नाच्या आमिषाने १३ तरुणींना गंडा, तरुण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 5:32 AM