10 महिन्यांतील कारवाई : पद आणि अधिकारांचा वापर माया जमवण्यासाठी
लक्ष्मण मोरे - पुणो
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 1 जानेवारी ते 13 ऑक्टोबर्पयत केलेल्या 41 कारवायांमध्ये सुमारे 13क् कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे. गेल्या वर्षी राज्यातील अपसंपदेच्या 16 प्रकरणांमध्ये 22 कोटी 92 लाख 49 हजार 758 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या 1क् महिन्यांत कारवाईचा उच्चांक केला आहे. या कालावधीत अपसंपदेच्या प्रकरणांमध्ये गुंतलेल्या 73 जणांवर कारवाई करून 129 कोटी 6क् लाख 16 हजार 14 रुपये वसूल केले आहेत.
सापळा रचून लाचखोराला रंगेहाथ अटक केल्यानंतर संबंधित अधिकारी वा कर्मचा:याच्या नोकरीला लागल्यापासूनच्या कालावधीतील उत्पन्न, यासोबतच अन्य उत्पन्नाचे ज्ञात स्रोत यांची माहिती घेतली जाते. कुटुंबाचे उत्पन्न, जमा खर्च याचा ताळेबंद मांडून झाल्यावर बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आणली जाते.
एसीबीमार्फत 1 जानेवारी ते 13 ऑक्टोबर्पयत अपसंपदेच्या प्रकरणांमध्ये सर्वाधिक प्रमाण पाटबंधारे विभागातील अधि:का:यांचे आहे. त्यानंतर महसूल विभागातील अधिकारी, त्याखालोखाल विविध महापालिकांच्या अधिका:यांचा समावेश आहे. यासोबतच पोलीस, जिल्हा परिषदा, नगर परिषदा, नगर रचना विभाग, विक्रीकर विभाग, समाज कल्याण विभाग, कृषी विभाग, वक्फ बोर्ड, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको, नगर सुधार प्रन्यास या विभागांमधील अधिका:यांनी पदांचा गैरवापर करून कोटय़वधींची माया गोळा केली. कारवायांमधील पाटबंधारे खात्याचे
19 अधिकारी तब्बल 7क् कोटी 5
लाख 84 हजार 195 रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणांमध्ये गुंतले आहेत. महसूल विभागातील 12 अधिकारी सुमारे 15 कोटी 86 लाख 51 हजार 851 रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणांमध्ये अडकलेले आहेत.
च्कोणत्याही प्रकरणामध्ये वर्ग 4च्या कर्मचा:यांचा साधा उल्लेखही एसीबीच्या अहवालामध्ये करण्यात आलेला नाही. या वर्षी एकूण 85 अधिका:यांची लाचखोरीसंदर्भात खातेनिहाय चौकशी सुरू आहे.
च्महसूल विभागातील
12 अधिकारी सुमारे
15 कोटी 86 लाख 51 हजार 851 रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणांमध्ये अडकलेले आहेत. या अधिका:यांची विभागनिहाय चौकशी सुरू आहे.
विभागनिहाय प्रमुख प्रकरणो
विभागाचे नावप्रकरणोआरोपीबेहिशेबी मालमत्ता
पाटबंधारे विभागक्8197क्,5 ,86,195
महसूलक्81115,86,51,851
महापालिकाक्6112,2,9,276
समाज कल्याण क्2क्313,33,89,335
पोलीसक्3क्31,3क्,21,746
सार्व. बांधकामक्4क्611,34,34,263