मुंबई : गेल्या सहा वर्षात ट्रॅकवर काम करताना झालेल्या अपघातांत १३१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे माहिती अधिकारांत उघड झाले आहे. एका वर्षात २२ जणांचा मृत्यू झाला आहे. २0१0 ते २0१५ या दरम्यान ट्रॅकवर काम करताना किती रेल्वे कामगार, कंत्राटी कामगार, गँगमन यांचा मृत्यू झाला होता याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी लोहमार्ग पोलिसांकडे मागितली होती. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर दादर रेल्वे हद्दीत सर्वाधिक अपघात झाले असून त्याची संख्या १९ एवढी आहे. त्यानंतर अन्य पोलीस हद्दीत कुर्ल्यात १७, कल्याण येथे १४, डोंबिवलीत १३, सीएसटीत ११, ठाण्यात १0, कर्जत येथ ५ आणि बोरीवली तसेच पालघरमध्ये प्रत्येकी सात मृत्यू झाले आहेत. अंधेरी आणि वसई रोड येथे प्रत्येकी सहा, वाशी, वांद्रे, मुंबई सेन्ट्रल येथे प्रत्येकी चार, पनवेल ३ आणि वडाळा येथे प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. (प्रतिनिधी)
सहा वर्षांत ट्रॅकवर १३१ रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू
By admin | Published: May 17, 2016 3:29 AM