ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 07 - देशभरात 1 जुलैपासून वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील महापालिकेकडील घेण्यात येणारा जकात आणि एलबीटी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, जकात आणि एलबीटी बंद झाल्याने राज्यातील 26 महापालिकांना जीएसटीचे 1385 कोटी 27 लाख अनुदान देण्यात आले आहे.
यामध्ये मुंबई 647.34, ठाणे 59.30, नवी मुंबई 77.92, पुणे 137.30, चिंचवड 128.97, नाशिक 73.40, नागपूर 42.44, कल्याण डोंबिवली 19.92, उल्हासनगर 12.85, भिवंडी 18.10, वसई 27.06, मीरा-भाईंदर 19.51, जळगाव 8.78, नांदेड 5.68, सोलापूर 18.60, कोल्हापूर 10.35, अहमदनगर 7.12, औरंगाबाद 20.30, अमरावती 7.82, चंद्रपूर 4.49, परभणी 1.54, लातूर 1.25, सांगली 10.95, मालेगाव 11.68, धुळे 7.34 आणि अकोला महापालिकेला 5.29 इतके अनुदान जाहीर झाले आहे.
दरम्यान, हा निधी 70 टक्क्यांचा मर्यादेत आहे. यापूर्वी मुंबई वगळता सर्व महापालिकांना एलबीटीचे अनुदान देण्यात येत होते. मुंबईला पहिल्यांदाच अनुदान मिळत असून याआधी याठिकाणी जकात होती, ती आता बंद झाली आहे. तसेच, नव्या पनवेल महापालिकेचा या यादीत समावेश नाही हे विशेष. दरम्यान, हा जीएसटीचा पहिला हप्ता वितरीत करण्यात आला आहे.