शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

१४ कोटींची ‘माया’ पकडली, पण अद्याप नाही गोठवली...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 10:39 AM

एसीबीच्या आकडेवारीनुसार, नगरविकास विभागाकडे सर्वाधिक पाच प्रकरणात साडेतीन कोटींची मालमत्ता गोठविण्याबाबत अहवाल सादर करण्यात आला आहे.

मुंबई : एसीबीच्या पथकाने कारवाई करीत लाचखोरांचे घबाड उघडकीस आणले. लाचखोरांनी भ्रष्टाचारातून जमविलेली हीच १४ कोटी ३ लाखांची मालमत्ता गोठविण्यास शासन मंजुरी मिळावी म्हणून प्रलंबित आहे. यामध्ये मुंबई सहा, पुणे, नांदेडमधील दोनसह छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमधील प्रत्येकी एका प्रकरणाचा समावेश आहे.

एसीबीच्या आकडेवारीनुसार, नगरविकास विभागाकडे सर्वाधिक पाच प्रकरणात साडेतीन कोटींची मालमत्ता गोठविण्याबाबत अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ कृषी, पोलिस, परिवहन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, आरोग्य विभागाचा समावेश आहे. पालिकेच्या ए वॉर्डमधील कामगार रवींद्र जाधव (४९) याची ७० लाख ३१ हजार किमतीची मालमत्ता गोठविण्याबाबत १८ मार्च २०२० मध्ये गृह विभाग अपर मुख्य सचिवांकडे एसीबीने अहवाल सादर केला.

२१ जानेवारी २०२१ रोजी गोठविण्याच्या मालमत्तेत तफावत आढळून आल्याने गृह विभागाकडून कळविण्यात आली. त्यानुसार, १३ मार्चपर्यंत एसीबीकडून पाचवेळा त्रुटी दूर करून अहवाल पाठविण्यात आला. मात्र, अद्यापही शासनाला या प्रकरणासह अन्य प्रकरणात मुहूर्त मिळाला नसल्याचे दिसून येत आहे. 

प्रमुख प्रकरणे...सार्वजनिक बांधकाम कोकण पाटबंधारेमधील सेवानिवृत्त मुख्य अभियंता बाळासाहेब पाटील यांची २ कोटी ८२ लाख ५२ हजार रुपयांच्या मालमत्तेचा यामध्ये समावेश आहे. २०१६ मध्ये त्यांच्या एसीबीने कारवाई केली. गेल्यावर्षी ८ एप्रिलला एसीबीने मालमत्ता गोठविण्याबाबत अहवाल पाठविला असून, अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही.

दोषी ठरवूनही १६ जण सेवेत११ ऑक्टोबर २०२३ पर्यंत दोषी ठरवूनही १६ जणांना बडतर्फ केलेले नाही. यामध्ये पुणे, नागपूरमधील प्रत्येकी ४, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येकी २ आणि ठाणे आणि नांदेडमधील एका प्रकरणाचा समावेश आहे. यामध्ये एका क्लास वन अधिकाऱ्यासह क्लास टू मधील ४ तर क्लास थ्रीचे १० आणि इतर लोकसेवक १ अशा १६ जणांचा समावेश आहे.

कुठल्या विभागाचे किती?ग्रामविकास ५९, शिक्षण ४८, महसूल १८, पोलिस १८, सहकार पणन ६, नगरविकास २७, उद्योग/उर्जा व कामगार विभाग ३, आरोग्य ४, विधी व न्याय १, वने १, नगर परिषद २, समाज कल्याण १, कृषी ४, वित्त व विक्रीकर १, परिवहन ३, अन्न व नागरी पुरवठा ०, आदिवासी १, गृहनिर्माण ३, अन्न व औषधी द्रव्ये १ यांचा समावेश आहे. 

नागपूरवर विशेष प्रेम का?नागपूरमधील सर्वाधिक ५८ लाचखोरांची नोंद आहे. यामध्ये ग्रामविकास विभागाचे २९, शिक्षण क्रीडा १४, महसूल ८, सहकार पणन २, नगरविकास ३, उद्योग उर्जा १, आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. असे असतानाही या सर्वांवर अद्याप कारवाई नाही.

घराच्या दुरुस्तीसाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मे २०२१ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेले आरे दुग्ध डेअरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी  नथू विठ्ठल राठोड (वय ४२) यांची ३ कोटी ६० लाख किमतीची मालमत्ता गोठविण्याबाबतचा प्रस्ताव ११ जुलै २०२३ रोजी सादर करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग