- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - दहीहंडी खेळताना 20 फुटांहून जास्त उंच हंडी न लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले असतानाही अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघन करत दहीहंडी खेळली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने 20 फुटांपेक्षा अधिक उंची आणि 18 वर्षांखालील गोविंदांना दहीहंडीत बंदी घातली आहे. दरम्यान दहीहंडी खेळताना 14 गोविंदा जखमी झाले असून त्यांना मुंबईतील वेगवेगळया रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
केईम आणि ट्रॉमा रुग्णालयात प्रत्येकी 3, व्ही एन देसाई रुग्णालयात 4 तर सायन, नानावटी, नायर आणि शताब्दी रुग्णालयात प्रत्येकी एका गोविंदाला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यामधील 10 गोविंदांना उपचारानंतर सोडून देण्यात आलं आहे.
दरम्यान नियम मोडणा-या दहीहंडी मंडळांवर कारवाई होणार आहे. कोर्टाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करणार असून 188 कलमान्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.
(फोटो : विशाल हळदे)