शिवसेना उमेदवारांना हरवणारे 14 जण 'ठाकरे सरकार'मध्ये मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 10:22 AM2020-01-06T10:22:45+5:302020-01-06T11:47:26+5:30
भाजपा उमेदवारांचा पराभव करणारे 12 जण मंत्री
मुंबई: अनेक दिवसांपासून रखडलेलं उद्धव ठाकरे सरकारचं खातेवाटप काल जाहीर झालं. महाविकास आघाडीतील मंत्र्यांचा शपथविधी आणि त्यांचं खातेवाटप यासाठी महिन्याभरापेक्षाही जास्त कालावधी लागला. उद्धव ठाकरेंनी नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सर्व जागा भरल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळातील एक तृतीयांश सदस्य (14) शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव केलेले आहेत. तर 12 जणांनी भाजपा उमेदवाराचा पराभव केलेला आहे.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी मंत्रिमंडळातील 43 पैकी 39 मंत्री विधानसभेचे सदस्य आहेत. या 39 पैकी 21 मंत्र्यांनी सत्तारुढ महाविकास आघाडीतील पक्षांचाच पराभव केला आहे. उद्धव यांच्या मंत्रिमंडळातील 14 मंत्र्यांनी शिवसेना उमेदवारांचा पराभव करुन विधानसभा गाठली. तर 12 मंत्र्यांनी भाजपा उमेदवारांना धूळ चारली आहे. ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेल्या 4 जणांनी राष्ट्रवादी, 3 मंत्र्यांनी काँग्रेस तर 6 मंत्र्यांनी अपक्ष उमेदवारांचा पराभव करुन विधानसभा निवडणूक जिंकली आहे.
शिवसेना उमेदवारांना पराभूत करुन विधानसभा गाठणाऱ्या आणि त्यानंतर मंत्री झालेल्यांमध्ये बाळासाहेब थोरात (संगमनेर), के. सी. पाडवी (अक्कलकुवा), छगन भुजबळ (येवला), जितेंद्र आव्हाड (मुंब्रा-कळवा), अदिती तटकरे (श्रीवर्धन), राजेंद्र पाटील (शिरोळ), दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), विश्वजीत कदम (पलूस-कडेगाव), राजेश टोपे (घनसावंगी), नवाब मलिक (अणुशक्तीनगर), वर्षा गायकवाड (धारावी), यशोमती ठाकूर (तिवसा), विजय वडेट्टीवार (ब्रह्मपुरी), राजेंद्र शिंगणे (सिंदखेड राजा) यांचा समावेश होतो.
विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करुन महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री झालेले आमदार
1) प्राजक्त तनपुरे (राहुरी)
2) शंकरराव गडाख (नेवासा)
3) अजित पवार (बारामती)
4) दत्तात्रय भरणे (इंदापूर)
5) अशोक चव्हाण (भोकर)
6) धनंजय मुंडे (परळी)
7) संजय बनसोडे (उदगीर)
8) अमित देशमुख (लातूर शहर)
9) अस्लम शेख (मालाड पश्चिम)
10) अनिल देशमुख (काटोल)
11) नितीन राऊत (नागपूर उत्तर)
12) सुनील केदार (सावनेर)
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव केलेले महाविकास आघाडी सरकारमधील 4 मंत्री
1) उदय सामंत (रत्नागिरी)
2) शंभूराज देसाई (पाटण)
3) संदीपान भुमरे (पैठण)
4) आदित्य ठाकरे (वरळी)
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव केलेले महाविकास आघाडी सरकारमधील 3 मंत्री
1) दादाजी भुसे (मालेगाव बाह्य)
2) एकनाथ शिंदे (कोपरी-पाचपाखडी)
3) बच्चू कडू (अचलपूर)
विधानसभा निवडणुकीत अपक्षांचा पराभव केलेले महाविकास आघाडी सरकारमधील 6 मंत्री
1) गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण)
2) हसन मुश्रीफ (कागल)
3) जयंत पाटील (इस्लामपूर)
4) बाळासाहेब पाटील (कराड उत्तर)
5) सत्तार अब्दुल (सिल्लोड)
6) संजय राठोड (दिग्रस)