शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

पासवर्ड चोरून एटीएममधून १४ जणांची फसवणूक करणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2017 8:16 PM

गर्दी असलेल्या एटीएम सेंटरवर रांगेत उभे राहून घाई करीत समोरच्या व्यक्तींना गोंधळात टाकून, तर कधी पासवर्ड हेरून कार्डची अदलाबदल करीत १४ जणांच्या बँक खात्यातून तब्बल ५ लाख ५९ हजार ५०० रुपये काढून फसवणूक करणाऱ्यास मुकुंदवाडी पोलिसांनी अखेर पकडले.

औरंगाबाद, दि. 2 - गर्दी असलेल्या एटीएम सेंटरवर रांगेत उभे राहून घाई करीत समोरच्या व्यक्तींना गोंधळात टाकून, तर कधी पासवर्ड हेरून कार्डची अदलाबदल करीत १४ जणांच्या बँक खात्यातून तब्बल ५ लाख ५९ हजार ५०० रुपये काढून फसवणूक करणाऱ्यास मुकुंदवाडी पोलिसांनी अखेर पकडले. आरोपीला पकडण्यासाठी सायबर क्राइम एक्सपर्टचे योगदान महत्त्वपूर्ण होते, अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी पत्रकार परिषदेत दिली.मोहम्मद सलीम हजीर खान (३३,रा. सुनारी, ता. तौर, जि. मेवात, हरियाणा) असे अटक आरोपीचे नाव आहे. उपायुक्त म्हणाले की, गतवर्षी २८ मे २०१६ रोजी विनायक मेळगावे (रा. रामनगर, सिडको) यांच्या एटीएम कार्डचा वापर करून अज्ञात व्यक्तीने बँक खात्यातून ३५ हजार रुपये काढले होते. एटीएममधून रक्कम काढण्यात आली तेव्हाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. मुकुंदवाडी परिसरातील भाजी मंडई आणि एपीआय कॉर्नर येथील एटीएम सेंटरसह अन्य दोन एटीएम सेंटरमध्ये कार्डची अदलाबदल करून, पासवर्ड चोरून आणि रांगेत उभ्या राहणाऱ्या व्यक्तींच्या खात्यातून रकमा पळविण्याच्या तब्बल १४ घटना वर्षभरात घडल्या. काही वेळा पैसे काढण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करून पासवर्ड विचारल्यानंतर आरोपी कार्डची अदलाबदल करून फसवणूक करायचा, तर कधी तो रांगेत उभे असलेल्या व्यक्तींना लवकर पैसे काढा,असे म्हणून घाई करायचा. मागील व्यक्तीला आपल्यामुळे उशीर होतो, असे समजून कार्ड एटीएममध्ये टाकल्यानंतर लवकर पैसे न आल्यास संबंधित व्यक्ती तेथून बाहेर पडली की, मागे उभा आरोपी सलीम एटीएममधील तांत्रिक बाबी हाताळून गैरफायदा घेई. सर्व ठिकाणच्या गुन्ह्यात, तेथील सीसीटीव्हीत हा आरोपी कैद झाला. मात्र तो सापडत नव्हता.सासूरवाडीत यायचा आणि फसवणूक करायचा४ ठिकाणच्या घटनास्थळ परिसरात काही जण एकमेकांच्या मोबाइलवर सतत संपर्कात असल्याचे पोलिसांना समजले. यातील एक क्रमांक कधी औरंगाबादेत तर कधी हरियाणा राज्यात असायचा. त्याच्याशी संपर्कात असलेली व्यक्ती खोडेगाव येथील असल्याने पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, सायबर क्राइम एक्स्पर्ट सहायक पोलीस निरीक्षक राहुल खटावकर, उपनिरीक्षक संजय बनसोडे, पोलीस कर्मचारी शेख अस्लम, कैलास काकड, प्रकाश सोनवणे, विष्णू हगवणे यांनी त्याच्याशी संपर्कात असलेल्या त्याच्या सासूरवाडीच्या लोकांना उचलले. त्यांच्या मदतीने त्यास औरंगाबादेत बोलावून ताब्यात घेतले, तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली.