शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

म्हाडा बांधणार १४ हजार घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2017 4:36 AM

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा २०१७-१८चा ६ हजार ८९१.४५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा २०१७-१८चा ६ हजार ८९१.४५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी प्राधिकरणाच्या विशेष बैठकीत मंजूर करण्यात आला. २०१७-१८ साली गृहनिर्माण कार्यक्रमांतर्गत व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदनिकांचे काम राज्यात होणार असून, सुमारे १४ हजार ४४० घरे बांधण्यात येणार आहेत. तर मुंबईतील ६७९ इमारतींची दुरुस्ती करण्याचे प्रस्तावित आहे.लॉटरी झालेल्या इमारतीच्या वितरणापोटी चालू वर्षी ६५५ कोटींपर्यंतची रक्कम घरांच्या विक्रीतून वसूल झाली आहे. पुणे, कोकण मंडळाकडे निर्माण झालेल्या घरांच्या विक्रीसह संपूर्ण राज्यातून ४ हजार २६६ कोटी मिळणार आहेत. म्हाडाच्या उपलब्ध जमिनीवरील कार्यक्रमांबरोबरच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरबांधणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, यासाठी सुमारे १ हजार ५९६.९७ कोटी खर्च अपेक्षित आहे. २०१७-१८ साली गृहनिर्माण कार्यक्रमांतर्गत व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदनिकांचे काम राज्यात होणार आहे. (प्रतिनिधी)६७९ इमारतींची दुरुस्ती मुंबई इमारत आणि पुनर्रचना मंडळाच्या माध्यमातून २०१६-१७मध्ये अंदाजित ७५७ मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरुस्ती करण्यात आली असून, पुढील वर्षी ६७९ इमारतींची दुरुस्ती करण्याचे अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले आहे.अनुदानासाठी २० कोटीराजीव गांधी ग्रामीण निवारा योजना अंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना कर्जावरील व्याजाच्या अनुदानासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.दुरुस्तीसाठी २५ कोटी पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.झोपडपट्ट्यांचे जीवनमान सुखकरमुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या माध्यमातून नागरी दलित वस्ती सुधार योजना, सौंदर्यीकरण, शासकीय जमिनीवर अतिक्रमण रोखण्यासाठी संरक्षण भिंती बांधणे इत्यादी कार्यक्रमांच्या माध्यमातून मुंबईतील झोपडपट्ट्यांचे जीवनमान सुखकर करणे अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे.