ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. २७ : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करण्याकरिता ह्यपदवीधरह्ण उमेदवार तीन दिवसांपासून सक्रीय झाले असून गत तीन दिवसात विभागातील १४ हजार पदवीधरांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदविले आहे. विशेष म्हणजे २३ दिवसात केवळ २५ हजार पदवीधरांनी या मतदार यादीत नाव नोंदविले होते.
अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या होवू घातलेल्या निवडणुकीसाठी जुनीच मतदार यादी गृहीत धरण्यात आली होती. या यादीवर आक्षेप घेण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाने नवीन मतदार यादी तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यानुसार अमरावती पदवीधर मतदार संघाच्या नवीन मतदार यादीत नाव नोंदणीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. १ आॅक्टोबर २०१६ ते ५ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत मतदार नोंदणी करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.
त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्षांचे उमेदवार देखील पदवीधर मतदार संघातील मतदार वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. असे असतानाही २३ आॅक्टोबरपर्यंत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये केवळ २५ हजार ४४१ मतदारांची नोंदणी झाली. दरम्यान गत तीन दिवसापासून मात्र मतदार नोंदणीमध्ये चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसामध्ये १४ हजार मतदारांची नोंद झाल्याने २७ आॅक्टोबर पर्यंत विभागातील पाच जिल्ह्यांमधून ३९ हजार २१७ पदवीधरांनी मतदार यादीत नाव नोंदविले आहे. नाव नोंदणीसाठी आठवड्याचा कालावधीपदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी ५ नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे या मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासाठी आता केवळ आठवड्याचा कालावधी शिल्लक आहे. विविध शासकीय कार्यालय आणि शाळा, महाविद्यालयांमधील पदवीधरांची नोंदणी आगामी तीन-चार दिवसात होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.
२७ आॅक्टोबर पर्यंत नोंदणी झालेले मतदारअकोला - ६१६५यवतमाळ- ४३६७वाशिम- ३४४९बुलडाणा - ७७२७अमरावती - १७४७८