मुंबई : दुष्काळामुळे मराठवाड्यात निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन जायकवाडी धरणातून गोदावरीच्या डाव्या कालव्यात १.४ टीएमसी पाणी पिण्यासाठी सोडण्याचा निर्णय औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी घेतला आहे. या निर्णयाचा फायदा बीडसह चार जिल्ह्यांना होणार आहे.यंदा पाऊस कमी झाल्याने मराठवाडयÞातील सर्वच धरणे कोरडी पडली असून जनतेला सध्या भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा भयानक परिस्थितीत तहानलेल्या जनतेला पाणी मिळावे यासाठी राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी पुढाकार घेऊन जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा आग्रह धरला होता. औरंगाबादचे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांना बोलून पाणी सोडण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा ,अशी सूचना केली. त्यानुसार आयुक्तांनी आज जायकवाडी धरणात उपलब्ध असलेल्या ६५ दलघमी साठ्यापैकी ३९.४० दलघमी म्हणजे १.४ टीएमसी पाणी फक्त पिण्यासाठी म्हणून गोदावरीच्या डाव्या कालव्यात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत संबंधित सर्व अधिका-यांची त्यांनी एक बैठक घेतली असून येत्या एक दोन दिवसात प्रत्यक्ष पाणी सोडण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
जायकवाडी धरणातून १.४ टीएमसी पाणी सोडणार
By admin | Published: February 25, 2016 12:32 AM