शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

अडीचशे फूट उंच टेकडीवर जगविले १४२ वटवृक्ष!

By admin | Published: November 02, 2016 5:55 PM

सुमारे अडीचशे फूट उंच ‘ती’ एक टेकडी. पावसाळ्यात आणि हिवाळ्यातील काही काळ प्रसन्न वाटणारी. उन्हाळ्यात ओसाड आणि निरस पडणारी.

ऑनलाइन लोकमत/अनिल गवई
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 02 -  सुमारे अडीचशे फूट उंच ‘ती’ एक  टेकडी. पावसाळ्यात आणि हिवाळ्यातील काही काळ प्रसन्न वाटणारी.  उन्हाळ्यात ओसाड आणि निरस पडणारी. मात्र, त्याच टेकडीचे एका अवलियाच्या प्रयत्नांनी आता रुपडे पालटले आहे. या अवलियाच्या वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपणाच्या ‘कृती’शील संकल्पाने टेकडीवर १४२ वटवृक्षांसोबतच फुल आणि फळझाडांची हिरवळ पसरली आहे.
 नांदुरा तालुक्यातील तरवाडी येथील डोंगराळ भागात सुमारे अडीचशे फूट उंच टेकडीवर हेमाड पंथी महादेवाचे पुरातन मंदिर आहे. टेकडीवर म्हणजेच बरडीवर स्थापित असल्यामुळे येथील महादेवाची बर्डेश्वर अशीच ओळख पंचक्रोशीत आहे. नवसाला पावणारा आणि जागृत देवस्थान म्हणून परिसरात अनेकांना या महादेवाचा प्रत्यय आल्याने, श्रावण महिन्यातील प्रत्येक श्रावण सोमवारी नांदुरा तालुक्यासह, खामगाव, मलकापूर, मोताळा तालुक्यातील आसपासच्या गावातील भाविकांची येथे गर्दी जमते. तथापि, श्रावण महिन्यात हिरवळीमुळे या बर्डेश्वर महादेव मंदिरात अतिशय प्रसन्न वाटते. निसर्ग रम्य परिसर असल्याने, दर्शनासोबतच काही जण पर्यटनाचाही आनंद घेतात. मात्र, टेकडीमुळे झाडं जगत नसल्याने तसेच उन्हामुळे हिवाळ्याच्या शेवटीच हा परिसर ओसाड वाटू लागतो. झाडं झुडपं नसल्याने, महाशिवरात्रीही ओसाडातच साजरी होत होती. ही बाब गेल्या १०-१२ वर्षांपासून या मंदिरात पौराहित्य करणाºया श्री राधेराधे महाराज यांच्या संवेदनशील मनावर खोलवर जखम करून गेली. त्यानंतर त्यांनी या टेकडीवर वृक्षारोपणाचा आणि संगोपणाचा संकल्प सोडला. टेकडीवर पाण्याचा अभाव आणि मुरूम असल्याने झाडे जगत नव्हती. अशाही परिस्थितीत खचून न जाता, त्यांनी आपला संकल्प नांदुरा येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष मोहता यांना सांगितला. सुभाष मोहता यांनी मदतीची तयारी दर्शविल्यानंतर सन २०११ पासून जमिनीपासून अडीचशे फूट उंच अंतरावर असलेल्या टेकडीवर वटवृक्षांच्या लागवडीला सुरूवात करण्यात आली. पहिल्याच टप्प्यात ५१ वृक्ष लावण्यात आली. यातील काही वृक्ष जगली. तीन टप्प्यात १४२ वटवृक्षांची लागवड करण्यात आली. यापैकी   काहीतर लवकरच कोमेजली. काही जळाली. तथापि,  मुरूम आणि नैसर्गिक आपत्तीमुळे जगू न शकलेल्या वटवृक्षाच्या ठिकाणी पुन्हा-पुन्हा वृक्ष रोपट्यांची लागवड केल्या जाते. त्यामुळे ओसाड टेकडीही हिरवी गार झाली आहे.
 
ओसाड टेकडीवर फुलली हिरवळ!
 वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपणाच्या  ध्येयाने प्रेरीत झालेल्या अवलियामुळे  ओसाड टेकडीवर आता १४२     वटवृक्षांसोबतच इतर फळ आणि फुलझाडांचीही हिरवळ फुलली आहे. अर्थातच टेकडीवर हिरवळ फुलविण्याचे अग्नीदिव्य कुणाच्याही मदतीशिवाय अशक्य होते. मात्र, ती गरज  नांदुरा येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष मोहता यांनी पूर्ण केली. टेकडीवर वृक्ष लावण्यासाठी नर्सरीतील वटवृक्षांच्या रोपांसोबतच व वृक्ष लावण्यासाठी खड्डे खोदण्यासाठी , सपाटीकरणासाठी जेसीबी आणि काळी मातीही पुरविली.
 
सात फुटांपर्यंत झाली वटवृक्षांची वाढ!
 टेकडीवर नर्सरीतील दीड-ते दोन फुट उंचीच्या लावण्यात आलेल्या वटवृक्षांपैकी अनेक वृक्षांची आता तब्बल सात फुटांपर्यंत वाढ झाली आहे. टेकडीवरील काठा-काठाने या वृक्षांची लागवड करण्यात आल्याने, कुंपनाचाही प्रश्न मिटला आहे. वृक्ष वृक्षाला जनावरे खात नाहीत. तसेच या वृक्षाची हानी होत नाही. त्यामुळे लागवडीसाठी प्रामुख्याने वटवृक्षालाच प्राधान्य देण्यात आले. सोबतच वटवृक्षाचे आध्यात्मिक महत्वही या निमित्ताने जोपासण्यात आले.
 
ओसाड टेकडीला निसर्ग रम्य बनविण्यासाठी टेकडीवर १४२ वटवृक्षांसोबतच इतरही वृक्षांची लागवड करण्यात आली. सामाजिक दायित्वाशिवाय हे काम अपूर्ण होते. २०११ पासून वृक्षारोपण आणि संगोपन केल्या जात आहे.
   -श्री राधेराधे महाराज गोसावी
महंत बर्डेश्वर महादेव देवस्थान, तरवाडी