मुंबई : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांना सहजगत्या प्रवास करता यावा, याकरिता मध्यरेल्वेतर्फे मार्च ते जून या कालावधीत १४४ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची संख्या अधिक असते.दादर-भुसावळ सुपरफास्ट वीकली स्पेशलच्या २६ फेऱ्या असून, गाडी क्रमांक ०१०८१ ही गाडी १ एप्रिल ते २४ जून या कालावधीत दर शुक्रवारी दादर स्थानकातून रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल आणि भुसावळ येथे सकाळी ५ वाजता पोहोचेल. ही गाडी ठाणे, कल्याण, कसारा(०१०८१), इगतपुरी, नाशिक रोड, चाळीसगाव आणि जळगाव या स्थानकांवर थांबेल. तर गाडी क्रमांक ०१०८२ ही गाडी २ एप्रिल ते २५ जून या कालावधीत भुसावळ येथून सकाळी ८ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल आणि दादर स्थानकात सायंकाळी ४ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल.दादर सावंतवाडी रोड ट्राय वीकली स्पेशलच्या ४६ फेऱ्या असणार आहेत. गाडी क्रमांक ०१०९५ दादर सावंतवाडी रोड गाडी १७ एप्रिल ते ७ जून या कालावधीत रविवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी सुटेल. ही गाडी दादर स्थानकातून सकाळी ७.५० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे रात्री ८.३० वाजता पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक ०१०९६ ही गाडी सावंतवाडी स्थानकातून सोमवार, बुधवार आणि शनिवार सकाळी ४.५० वाजता सुटेल आणि मुंबईत दुपारी ३.५० वाजता पोहोचेल. दादर-झारप ट्राय वीकली स्पेशलच्या २६ फेऱ्या असणार आहेत. गाडी क्रमांक ०१०३३ १८ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत चालवण्यात येईल. ही गाडी दादर स्थानकातून सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि झाराप येथे रात्री ७.५५ ला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०३४ ही गाडी झारप स्थानकातून सोमवार, बुधवार आणि शनिवारी सकाळी ५ वाजता सुटेल आणि मुंबईत सायंकाळी ३.५० वाजता पोहोचेल.एलटीटी-नागपूर सुपरफास्ट वीकली स्पेशलच्या २६ फेऱ्या असतील. गाडी क्रमांक ०१०१७ ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून ३ एप्रिल ते २६ जून या कालावधीत रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. दुपारी ३ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०१८ ही गाडी नागपूर स्थानकातून रात्री ९.१५ वाजता सुटेल आणि दुपारी १२.१० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. एलटीटी-करमाळी वीकली एसी स्पेशलच्या २० फेऱ्या असतील. (प्रतिनिधी)
उन्हाळी सुट्ट्यांसाठी १४४ विशेष गाड्या
By admin | Published: March 14, 2016 2:22 AM