भाजपचे 15 ते 20 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात; 'या' नेत्याच्या पवार भेटीने चर्चांना पाठबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 04:57 PM2019-11-16T16:57:49+5:302019-11-16T17:04:58+5:30
आधी काँग्रेसचे आणि आता भाजपमधून आमदार झालेले जयकुमार गोरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. किंबहुना भाजपला गळती लागणार असं चित्र तयार होत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी देखील अशाच प्रकारच्या चर्चा रंगल्या होत्या. एकूणच जयकुमार गोरे यांच्या भेटीने भाजपला गळती लागणार अशी चिन्हे दिसत आहेत.
मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वेध लागले की, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यातच पक्षांतर करून गेलेले नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. त्यांच्या दाव्याला एका नेत्याच्या भेटीने पाठबळ मिळाले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी 30 हून अधिक नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. तर काँग्रेसमधीलही अनेक नेते भाजपमध्ये सामील झाले होते. यापैकी अनेक नेते पराभूत झाले असून काही नेत्यांचा विजय झाला आहे. मात्र या नेत्यांना पक्षात सामील करूनही हेतू साध्य झाला नसल्याने भाजपमधून या नेत्यांना फारस महत्त्व मिळत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे हे नेते अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान जयंत पाटील यांनी भाजपचे 15-20 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. मात्र ही अफवा असल्याची चर्चाही समोर आली. परंतु, आधी काँग्रेसचे आणि आता भाजपमधून आमदार झालेले जयकुमार गोरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. किंबहुना भाजपला गळती लागणार असं चित्र तयार होत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी देखील अशाच प्रकारच्या चर्चा रंगल्या होत्या. एकूणच जयकुमार गोरे यांच्या भेटीने भाजपला गळती लागणार अशी चिन्हे दिसत आहेत.