शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

आदिवासींसाठीच्या डिझेल इंजीन खरेदी प्रकरणी १५ कोटींचा घोटाळा

By admin | Published: May 09, 2017 2:42 AM

आदिवासींसाठी डिझेल इंजीन खरेदी प्रकरणी दहा प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयांनी ७७५८ डिझेल इंजिनांचे वाटप लाभार्थ्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आदिवासींसाठी डिझेल इंजीन खरेदी प्रकरणी दहा प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयांनी ७७५८ डिझेल इंजिनांचे वाटप लाभार्थ्यांना न करता त्याची बेकायदा विल्हेवाट लावल्याने सरकारला १४ कोटी ८९ लाख ५३ हजार ६०० कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागला आहे, अशी माहिती उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. एम.जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीने उच्च न्यायालायत सादर केलेल्या अहवालतून उघडकीस आली आहे. आदिवासी योजनांमध्ये झालेल्या घोटाळ्यासंबंधी नाशिकचे बहिराम मोतीराम यांनी अ‍ॅड. राजेंद्र रघुवंशी व अ‍ॅड. रत्नेश दुबे यांच्याद्वारे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेच्या सुनावणीत राज्य सरकारने या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्या. एम.जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नेमली.या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार, दहा जिल्ह्यांतील प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयांनी (आरएमओ) ३५०७७ लाभार्थ्यांना डिझेल इंजिनांचे वाटप करायचे होते. परंतु, त्यांनी २७३१९ लाभार्थ्यांनाच डिझेल इंजिनांचे वाटप केले. उर्वरित ७७५८ डिझेल इंजिनांची बेकायदा विल्हेवाट लावली. अशा प्रकारे दहा आरएमओंनी १४ कोटी ८९ लाख ५३ हजार ६०० कोटींचा अपहार केला. अधिकार नसतानाही डिझेल इंजीन खरेदीचा आदेशडिझेल इंजीन खरेदीसंदर्भात ३० डिसेंबर २००४ रोजी तत्कालीन आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत डिझेल इंजीन खरेदीसाठी निविदा प्रक्रिया हाती घेण्यात आली. त्यासंदर्भातील अधिकार ठराव मंजूर न करताच तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आले. संचालक मंडळाऐवजी कार्यकारी समितीने त्यांना हा अधिकार दिला. कायद्याने त्यांना हा अधिकार नाही , असे अहवालात म्हटले आहे.‘आकाशदीप’ला झुकते मापडिझेल इंजीन बसवण्याचे व वाटपाचे काम सोपवण्यात आलेल्या आकाशदीप कंत्राटदाराला कार्यकारी समितीकडून झुकते माप देण्यात आल्याचेही अहवालावरून स्पष्ट होते. इंजीन खरेदी केल्यानंतर त्याचे वाटप करण्यासंदर्भात कंत्राट देण्याबाबत संचालक मंडळाने ठराव मंजूर केला नसतानाही कार्यकारी समितीने आकाशदीप कंत्राटदाराला काम दिले. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अनामत रक्कम घेण्यात आली नाही. या कंपनीचे सर्वेसर्वा गिरीश परदेशी हे गावितांचे अत्यंत जवळचे आहेत. या कामासाठी कंत्राटदाराला ८ कोटी ३१ लाख ९५ हजार ८४७ रुपये देण्यात आले. त्याला एवढ्या रकमेत ३२,८३१ इंजिनांचे वाटप करून बसवायचे होते. मात्र प्रत्यक्षात त्याने २७,३१९ इंजिनांचे वाटप करून बसवले. त्यामुळे ७७५८ इंजिनांचे वाटप आणि बसवण्याचे शुल्क आकारण्याचा अधिकार नसतानाही त्याला त्यासाठी अतिरिक्त १ कोटी ९५ लाख ८८ हजार ९५० रुपये देण्यात आले. त्यामुळे गायकवाड समितीन नंदुरबार येथील आकाशदीप विद्युत कामगार सहकारी संस्थेकडून अतिरिक्त रक्कम वसूल करण्याची शिफारस केली आहे. (प्रतिनिधी)