नाशिक : दोन, चार नव्हे तर तब्बल पंधरा देशांची ‘सीमा’ मोटार प्रवासाद्वारे ओलांडून नाशिकच्या तिघा मित्रांनी ‘सीमा रेषेपलीकडचे जग’ अनुभवले. सुमारे वीस हजार किलोमीटरचा प्रवास करीत लंडन ते थेट म्यानमारमार्गे तिघे मित्र भारतात दाखल झाले. हा ५० दिवसांचा आव्हानात्मक, थरारक अन् रोमांचकारी प्रवास त्यांनी चारचाकी वाहनातून पूर्ण केला. नाशिकमध्ये आल्यावर त्यांनी आपले अनुभव कथन केले. ‘ग्लोब व्हिलर्स’तर्फे ‘लंडन ते नाशिक’ असे ऐतिहासिक पंधरा राष्ट्रांचे देशाटन आशिष कटारिया, राजेंद्र पारख व संजीव बाफणा या तिघा मित्रांनी ५० दिवसांमध्ये पूर्ण केले. ८ मे रोजी टोयोटा फॉर्च्युनर मोटारीने लंडनपासून पंधरा देशांच्या सफरीला त्यांनी प्रारंभ केला. सुरवातीला ‘लंडन ते भारत (नाशिक) असा नेपाळ मार्गे सुमारे १४ हजार किलोमीटरचा प्रवास निश्चित झाला. मात्र नेपाळजवळील रस्ता भूकंपामुळे खचल्याने प्रवासात अडथळा आला. त्यामुळे त्यांनी बर्फाळ मार्गाची निवड केली. पर्यायाने प्रवासात पाच हजार ५०० किलोमीटरची वाढ झाली. त्यासाठी त्यांनी मॉस्को शहरात व्हिसा मिळविला. तेथे शासकीय व्यवस्थेचा त्रास सहन करावा लागला. सर्व कागदपत्रांची तपासणी व पूर्तता करत सुमारे सात तासांनंतर त्यांना मॉस्को येथून अखेर व्हिसा मिळाला अन् त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. म्यानमारमधून त्यांनी १९ जून रोजी भारताच्या सीमेमध्ये प्रवेश के ला अन् २६ जून रोजी हे तिघे ‘रोड ट्रॅव्हलिंग’प्रेमी नाशकात पोहचले.२५ हजारांचा पथकर : चीनमधील महामार्गावरून प्रवास करताना ताशी १०० किलोमीटर वेगाने मोटारीने अंतर कापले. डोंगर पोखरून सुमारे २५ बोगद्यांमधून चीन सरकारने महामार्ग काढला आहे. एक बोगदा तर सुमारे वीस किलोमीटरचा आहे. चीनच्या महामार्गावरून सुमारे बाराशे किलोमीटरचे अंतर कापताना त्यांना २५ हजार रुपयांचा पथकर भरावा लागला.मिथुन अन् ऐश्वर्याची मदतसीमेवर कागदपत्रांच्या तपासणीच्या ससेमिऱ्याला तोंड देताना मिथुन चक्रवर्ती, ऐश्वर्या आदी अभिनेत्यांच्या लोकप्रियतेचा संकटसमयी त्यांना उपयोग झाला. एकूणच परदेशात बॉलिवूडची मोहिनी त्यांनी अनुभवली.जगाची सफर करताना बदलणारी भाषा, धर्म, संस्कृती अन् त्यापलीक डे उत्तम आदरातिथ्य, आपुलकीच्या भावनेतून होणारी विचारपूस यामुळे सफर अविस्मरणीय ठरली.- आशिष कटारियाअनोख्या व आव्हानात्मक प्रवासात आम्हाला विभिन्न भाषा बोलणारे लोक भेटले. त्यांची कार्यपद्धती, लोकसंस्कृ ती, परंपरा आदींबरोबरच विविध देशांचे नैसर्गिक सौंदर्य, इतिहास जवळून अनुभवता आला. - राजेंद्र पारख
मोटारीने ५० दिवसांत १५ देशांची सफर !
By admin | Published: June 28, 2015 2:16 AM