शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

उजनीत अवघा १५ टक्के साठा

By admin | Published: April 07, 2017 1:05 AM

मागील वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे काठोकाठ भरलेले उजनी धरण ढिसाळ नियोजनामुळे कोरडे पडू लागले आहे.

बारामती : मागील वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे काठोकाठ भरलेले उजनी धरण ढिसाळ नियोजनामुळे कोरडे पडू लागले आहे. धरणाच्या उपयुक्त साठ्यामध्ये सध्या केवळ १५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत काटकसरीने धरणातील पाणीसाठा वापरावा लागणार आहे. उजनी धरणाला नेहमीच ढिसाळ नियोजनाचा फटका बसतो. सोलापूर जिल्ह्याला नदी व कालव्याद्वारे वर्षभर अनियंत्रित पाणी सोडले जाते. तसेच, या जिल्ह्यातील राजकीय व्यक्तींच्याही दबावाला येथील धरणप्रशासन बळी पडते. सध्या धरणामध्ये १५ टक्के पाणीसाठा आहे. साहजिकच पुणे, अहमदनगर, सोलापूर आदी जिल्ह्यातील धरणकाठच्या गावांमध्येच पाणी टंचाईच्या झळा जाणवणार आहेत. उजनी धरणातील पाणीपातळी कमी झाल्याने जलाशयाचा भाग उघडा पडला आहे. याचा फटका जलाशयाच्या काठच्या गावांना आणि शेतीला बसणार आहे. तसेच, धरणावर अवलंबून असणाऱ्या पाणी योजनांना देखील पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे बहुतेक गावांमध्ये सलग पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. सध्या उन्हाचा काडाका जास्त असल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. त्यामुळे देखील धरणाच्या पाणीपातळीत घट होणार आहे. उजनी हे महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी एक धरण आहे. तसेच, भीमा खोऱ्यातील सर्वांत मोठे धरण म्हणूनही उजनीचा उल्लेख होतो. पुण्यातील बहुतांश धरणांमधील पाणी अखेरच्या टप्प्यात उजनीत सोडले जाते. २०१५ मध्ये उजनीधरण तीव्र दुष्काळामुळे कधी नव्हे तेवढ्या नीचांकी पातळीवर गेले होते. २०१६ मध्ये पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात धरण पूर्णक्षमतेने भरले गेले. धरणात तब्बल ११० टक्के पाणीसाठा झाला. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे उजनी धरण काठोकाठ भरूनदेखील अवघ्या सहा-सात महिन्यांतच कोरडे पडू लागते. उजनीच्या कालव्यातून मागील दीड महिन्यापासून सोलापूरला पाणी सोडले आहे. धरणातील पाणीपातळी ४९२.१८५ मीटर आहे, तर एकूण साठा २ हजार ४३.६२ दशलक्ष घनफूट आहे, तर धरणातील उपयुक्तसाठा केवळ ८.५० टीएमसी एवढाच शिल्लक आहे. धरण परिसरातील तापमानाचा पारा चाळिशीच्या आसपास आहे. पुढेही दोन महिने तीव्र उन्हाळा असणार आहे.