ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 23 - तेरणा- मांजरा नदीच्या पुराचा 25 गावांना अतोनात फटका बसला आहे. नदीच्या पलीकडील 15 गांवाचा संपर्क तुटला आहे. जायचे झाले सर कर्नाटकच्या गावांना ३० किमीचा वळसा घालून जावे लागत आहे. हजारो हेक्टर पिके पान्यात आहेत.
निलंगा तालुक्यातील औराद भागात गेल्या 10 दिवसापासुन सतत पाऊस सुरू आहे. गेल्याआठवडयात या दोन्ही नदयाना पुर आला होता. तेव्हाही या संगमावरील पुलावर पाणी आले होते आता परत गुरुवारी दुपारी आचानक तेरणा व मांजरा या दोन्ही नदयाना पुर आला आहे. मांजरा नदीत पावसा सोबत मसलगा प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग मोठा सुरू आहे. सोबतच धनेगाव ता देवणी येथील बंधारयाचे पाणी सोडण्यात आल्यामुळे मांजरा नदी धोक्याच्या पातळीवर पाणी वाहत आहे. यात तेरणा नदी वरील सर्व आठ बँधारयाची दारे उघडली आहेत. परीणामी दोन्ही नदयाचे पाणी औराद संगमावर हाजारो हेक्टर शेतीत घुसुन पिकाचे नुकसान झाले आहे दोन दिवसा पासुन हालसी तुगाव पुल पान्या खाली आहेयाशिवाय औराद- वांजरखेडा पुल पान्या खाली आहे. या मुळे नदी पलीकडील 12 गावांचा सम्पर्क औरादशी तुटला आहे. या संगमावरुन एक ट्रक्टर काल वाहुन गेले. त्यातील चार जण पोहत येऊन जीव वाचवला.