शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
2
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
5
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
6
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
7
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
8
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
9
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
10
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
11
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
12
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
13
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
14
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
17
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
18
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
20
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?

अनंत गीते यांच्या माध्यमातून १५० कोटींचा घोटाळा

By admin | Published: October 12, 2016 6:36 AM

रोहा येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या संकल्पनेतून रायगड लोकसभा मतदार संघातील आठवीच्या विद्यार्थ्यांना

अलिबाग : रोहा येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या संकल्पनेतून रायगड लोकसभा मतदार संघातील आठवीच्या विद्यार्थ्यांना आकांक्षा ट्रस्ट मार्फत पाच हजार टॅबचे वाटप, बुधवारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मात्र या टॅब खरेदीकरिता केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या अखत्यारीत येणाऱ्या मोठ्या कंपन्यांचा सामाजिक उत्तर दायित्व निधी(सीएसआर)आकांक्षा ट्रस्टच्या माध्यमातून वापरण्यात येत आहे. केंद्रीय गिते यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी मंगळवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.काही महिन्यांपूर्वी मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना टॅब वाटप करुन त्यासाठी ४०० कोटी रुपये शिवसेनेने खाल्ल्याचे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेसनेच उघडकीस आणले होते. त्या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. त्याच पद्धतीने मुंबईतील या कोट्यावधी रुपयांच्या टॅब घोटाळ््याचा पुढील टप्पा शिवसेना केंद्रीय मंत्री गीते यांच्या माध्यमातून रायगडमध्ये करीत असून त्यातून किमान १५० कोटी रुपये खाण्याचा हा प्रकार असल्याचे मलिक यांनी सांगितले. टॅब खरेदीसाठी आपल्या अधिकार क्षेत्रातील कंपन्यांचा सिएसआर वापरुन आपल्या पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री गिते यांची सीबीआय चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. बुधवारी रोहा येथे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारा हा कार्यक्रम शिवसेनेचा आहे की शासकीय आहे या बाबत सुस्पष्टता नाही. अशा परिस्थितीत केंद्र शासनाचा सार्वजनिक उपक्रम असणाऱ्या केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक अतूल सोबती आणि भारत सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांचे अतिरिक्त सचिव मधुकर गुप्ता हे दोन वरिष्ठ सरकारी अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहत आहेत. राजकीय पक्षाच्या कार्यक्रमास सरकारी अधिकाऱ्यांना उपस्थित राहाता येत नाही. अशा परिस्थितीत हे दोन अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहिल्यास त्या दोघांनाही सरकारी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी करत असल्याचे सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री गीते यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. त्याचे स्विय्य सहाय्यक जोशी यांच्याशी संपर्क साधला असता गिते मातोश्री बंगल्यावर बैठकीत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)