मुंबई : महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी के. एच. गोविंदराज यांची आज बदली करण्यात आली. ते पराग जैन यांच्या जागी येत आहेत. एकूण १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राजीव गांधी जीवनदायी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रदीप व्यास यांची बदली आयुक्त (कुटुंब कल्याण) आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य मिशन या पदावर करण्यात आली आहे. प्रभाकर देशमुख हे कोकण विभागाचे नवे महसूल आयुक्त असतील. नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बी. आर. जाधव यांची बदली मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात करण्यात आली आहे. रमेश देवकर हे अपंग कल्याण आयुक्तालयाचे (पुणे) नवे आयुक्त असतील. खादी व ग्रामोद्योग मंडळातून बदली झाल्यानंतर ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. आतापर्यंत अपंग आयुक्तालयात असलेले एन. के. पोयाम यांची बदली पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त म्हणून करण्यात आली. नागपूर सुधार प्रन्यासच्या (एनआयटी) सभापती पदी दीपक म्हैसेकर यांना नेमण्यात आले. निंबाळकर हे ठाणे जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी हे हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून जात आहेत. अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र सिंह याच पदावर चंद्रपूर जिल्हा परिषदेत जात आहेत. नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त नयना गुंडे या वर्धा जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. आर. व्ही. गमे यांची बदली महाबीज; अकोलाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून करण्यात आली. बी. जी. पवार यांना गृहनिर्माण विभागात सहसचिव म्हणून पाठविण्यात आले. के. बी. उमप हे पशुसंवर्धन विभागाचे (पुणे मुख्यालय) नवे आयुक्त असतील. राज्य रस्ते विकास महामंडळाचे भूसंपादन अधिकारी अरुण विधळे हे अकोला जिल्हा परिषदेचे सीईओ असतील. (विशेष प्रतिनिधी)
१६ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
By admin | Published: June 01, 2016 4:30 AM