शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
4
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
5
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
6
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
7
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
8
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
9
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
10
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
11
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
12
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
13
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
14
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
15
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
16
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
17
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
18
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
19
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
20
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ

ट्रकचालकाकडून १६ लाख रुपयांचे साहित्य जप्त

By admin | Published: June 07, 2014 10:32 PM

ताब्यात घेतलेल्या ट्रकचालकाची चौकशी केल्यानंतर कोतवाली पोलिसांनी ट्रकसह ट्रकमधील ८ लाख ७१ हजार ५३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली

अकोला : अशोक वाटिका चौकातून शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतलेल्या ट्रकचालकाची चौकशी केल्यानंतर कोतवाली पोलिसांनी ट्रकसह ट्रकमधील ८ लाख ७१ हजार ५३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली असून, रविवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल. ट्रकमध्ये विद्युत डीपी व ट्रान्सफार्मरला लागणार्‍या ॲल्युमिनिअम व तांब्याच्या तारा चोरीच्या असल्याच्या संशयावरून कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ट्रकचालकास ताब्यात घेतले. ट्रकमध्ये ॲल्युमिनिअम व तांब्याची तार नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अशोक वाटिका चौकाजवळ आरजे ११ जीए ३0५६ क्रमांकाच्या ट्रकला कोतवाली पोलिसांनी थांबविले आणि ट्रक ताब्यात घेतला. या ट्रकमध्ये भांड्यांच्या मोडसोबतच विद्युत डीपी व ट्रान्सफार्मरला लागणार्‍या ॲल्युमिनिअम व तांब्याच्या तारा आढळून आल्या. या तारा वीज वितरण कंपनीच्या असून, त्या चोरीच्या असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. ८ क˜्यांमधील तांबे व ॲल्युमिनिअमच्या तारांची किंमत ८५ हजार रुपये आहे. तसेच पोलिसांनी ट्रकमधील ७ लाख ८६ हजार ५३५ रुपयांचे भंगार साहित्य आणि ८ लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त केला. पोलिसांनी राजस्थानमधील ढोलपूर येथील राहणारा ट्रकचालक महेंद्रसिंग प्रजापत याला अटक केली. महेंद्रसिंगने हे साहित्य गंभीरदास अमरचंद यांच्या गोडावूनमधून आणल्याचे आणि हे साहित्य ट्रकने दिल्लीला नेत असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस आता गंभीरदास अमरचंद यांची चौकशी करणार आहेत. ही कारवाई ठाणेदार अनिरूद्ध आढाव यांच्या मार्गदर्शनात एएसआय रामभाऊ बंड, श्याम शर्मा, राजेंद्र तेलगोटे, शेख माजीद, नदीम खान यांनी केली.