पुणे : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे (डीटीई) राज्यातील १६ पॉलिटेक्निक कॉलेजची संलग्नता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ नयेत. तसेच विभागीय डीटीई कार्यालयाने सुद्धा संबंधित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना कॅप राऊंड अंतर्गत प्रवेश देऊ नयेत, असे राज्याचे तंत्र शिक्षण संचालक डॉ. सुभाष महाजन यांनी स्पष्ट केले आहे. राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी संलग्न पाच वर्षांच्या आतील संस्थांचे वर्षातून दोन वेळा आणि पाच वर्षांपुढील संस्थांचे वर्षातून एकदा बहि:स्थ शैक्षणिक तपासणी समितीतर्फे पहाणी केली जाते. त्यात संबंधित संस्थेने आॅनलाईन पद्धतीने भरलेली माहितीची तसेच विद्यार्थ्यांकडून आलेल्या तक्रारी सूचनांची तपासणी केली जाते. त्यावरून संबंधित संस्थेला ‘एक्सलंट’, ‘व्हेरी गुड’, ‘गुड’, ‘सॅटिस्फॅक्टरी’ आणि ‘पुअर’ असे शेरे दिले जातात.शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मध्ये ज्या संस्थांमधील काही अथवा सर्व अभ्यासक्रमांना ‘पुअर’ शेरा मिळाला आहे, अशा संस्थांना त्रुटीपूर्ततेसाठी मुदत देण्यात आली. मात्र, ज्यांनी त्याची पूर्तता केली नाही, कॉलेजची संलग्नता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. संलग्नता रद्द केलेल्या संस्थापुणे विभाग- रामराव निकम कॉलेज, सातारा; मुंबई विभाग - डॉ. नंदकुमार तासगावकर कॉलेज, रायगड; नागपूर विभाग - श्रीमती आर. पुरोहित इन्स्टिट्यूट, नागपूर; कृष्णराव पांडव कॉलेज, नागपूर; राजेशकुमार वधावन इस्टिट्यूट, यवतमाळ; भाऊसाहेब मुळीक कॉलेज, नागपूर, भोंसाळे कॉलेज, अकोला; श्री बाबुलालजी अग्निहोत्री कॉलेज, वर्धा; गुरू साई कॉलेज, चंद्रपूर; गुरूकुल कॉलेज, गोंदिया, व्ही.जे.कॉलेज, चंद्रपूर; सम्राट सेवकभाऊ वाघये पाटील कॉलेज, भंडारा; औरंगाबाद विभाग - गंगामाई कॉलेज, धुळे; उत्तमराव महाजन कॉलेज, जळगाव, साईकृपा कॉलेज, अहमदनगर; पोतदार कॉलेज, जळगाव.
राज्यातील १६ पॉलिटेक्निकची संलग्नता रद्द
By admin | Published: June 19, 2015 2:48 AM