शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

वर्षभरात राज्यात १६ हजार ३३६ अर्भकांचा मृत्यू; मुंबईत सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 10:59 AM

स्वच्छता, पोषणमूल्य व आरोग्य सुविधांचा अभाव

- स्नेहा मोरे मुंबई : राज्यात अर्भकमृत्यूचे प्रमाण केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही मोठे असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, २०१८-१९ मध्ये राज्यात तब्बल १६ हजार ३३६ अर्भकांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात थोडी घट झाली आहे. २०१७-१८ मध्ये १७,२६५ अर्भकांच्या मृत्यूची नोंद झाली होती.मुंबईत सर्वाधिक अर्भकांचा मृत्यू झाला आहे. मुंबई शहर उपनगरात तब्बल १ हजार ७६३ अर्भकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीही मुंबईत १ हजार ७९६ अर्भकांचे मृत्यू झाले होते. पाणी, स्वच्छता, पोषणमूल्य व प्राथमिक आरोग्य सुविधांच्या अभावामुळे हे मृत्यू होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियान मोहिमेंतर्गत राज्यातील अर्भकमृत्यूदर १० पर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने २०१३ मध्येच निश्चित केले असले, तरी अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण अजूनही जास्तच आहे. राज्यातील २७ महापालिकांपैकी बहुतेक ठिकाणी नवजात शिशुंसाठी पुरेशी आरोग्य यंत्रणाच उपलब्ध नाही. परिणामी, अनेक महापालिकांमधील त्यातही मुंबईलगतच्या पाचही महापालिकांमधील नवजात अर्भके ही उपचारासाठी मुंबई महापालिकेच्या केईएम व शीव रुग्णालयात आणली जातात. मुंबई खालोखाल पुण्यात ९६० अर्भकांचे मृत्यू झाले आहेत, तर पुण्यानंतर सोलापूरमध्ये ८९२, नाशिकमध्ये ८५१ आणि सांगलीत ८४५ असे चित्र आहे.गेल्या वर्षभरात ९.७ टक्के मृत्यू संसर्गामुळे तर १०.८ टक्के अर्भकमृत्यू हे श्वसनाच्या त्रासामुळे झाल्याची नोंद आहे. राज्यातील महापालिका क्षेत्रांमध्ये पुरेशी व्यवस्था नसल्यामुळेच, २०१५ ते १८ या तीन वर्षांत तब्बल ३१ हजार ३३४ अर्भकमृत्यूंची नोंद झाली. त्यात मुंबई महापालिका क्षेत्रात १४ हजार १३६ अर्भकांचा मृत्यू झाल्याची माहिती नागपूर येथील अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.अनेक नवजात अर्भकांना मातेचे दूध मिळत नाही. त्यामुळे बाळाची प्रतिकारशक्ती क्षीण होते व बालकांवर विषाणूंचा हल्ला होतो. श्वसनाचा संसर्ग हेदेखील नवजात अर्भकांच्या मृत्यूमागचे प्रमुख कारण आहे.- डॉ. नयना भारद्वाज, बालरोगतज्ज्ञ      अर्भकमृत्यूची आकडेवारीवर्ष           २०१८-१९      २०१७-१८मुंबई          १,७६३          १,७९६पुणे              ९६०             ५३७सोलापूर       ८९२             ८७२नाशिक        ८५१            १,१४८सांगली         ८४५             ६४२अकोला       ८४१              ९३९महाराष्ट्र    १६, ३३६       १७,२६५

टॅग्स :Deathमृत्यूHealthआरोग्यMedicalवैद्यकीय