- गणेश खवसे
नागपूर : विदर्भात दोन महिन्यांत १६ पर्यटकांना जलसमाधी मिळाली. नागपूर जिल्ह्यात मौजमस्तीसाठी गेलेल्या १० तरुणांना जुलै महिन्यात जलसमाधी मिळाली. त्यात वेणा जलाशय परिसरातील एकाच घटनेत आठ तरुणांचा मृत्यू झाला, तर नागपंचमीच्या दिवशी परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या सहापैकी दोघांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू झाला.गोंदिया : शिरपूरबांध धरणावर आंघोळीसाठी गेलेल्या दोघा तरुणांचा बुडून मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यात हाजराफॉल, गोठणगाव, शिरपूरबांध, कालीसरार गावे पर्यटनस्थळे म्हणून ओळखली जातात. येथे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.चंद्रपूर : तलावात, नदीत बुडून मरण पावल्याच्या तीन दुर्घटना घडल्या. त्यात दोन विद्यार्थी व दोन बालकांचा बुडून मृत्यू झाला.भंडारा : वैनगंगा नदी, कोरंभीदेवी, रावणवाडी, चांदपूर जलाशय आणि गोसेखुर्द धरण पर्यटनासाठी असले तरी येथे ‘नो टुरिस्ट झोन’ म्हणून फलक लावलेले आहेत.यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा सुरक्षेच्या उपाययोजनांअभावी धोकादायक बनला आहे. उंचावरून कोसळणारा धबधबा अनुभवण्यासाठी काही वेळा पर्यटक लोखंडी बॅरिकेटस् ओलांडतात. त्यातून अपघात झाले आहेत.अमरावती : चिखलदरा पर्यटन स्थळावरील पंचबोल पॉइंटच्या दरीत ३१ जुलैला अकोल्यातील विनोद तितरे हा युवक पाय घसरून पडला होता. सुदैवाने झाडात अडकल्याने त्याचे प्राण बचावले.सेल्फीच्या नादात ८ तरुण जिवांचा अंतनागपूरपासून अवघ्या ३० किमी अंतरावरील वेणा जलाशयात ९ जुलैला घडलेली घटना थरकाप उडविणारी होती. सहलीसाठी गेलेले १० तरुण वेणा जलाशयात बोटीने फिरत असताना सेल्फीच्या नादात बोट उलटली. त्यात आठ तरुणांचा करुण अंत झाला.कुठे, किती पाऊस बरसला? कोणत्या धरणातून किती पाणी सोडण्यात येत आहे? याची माहिती दिली जाते. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकाºयांचा व्हॉट्सअॅप ग्रुप बनविण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज आहे.- अभिषेक नामदास, आपत्ती व्यवस्थापनप्रमुख, भंडारा