समीर कर्णुकमुंबई: न्यायालयाच्या आदेशानुसार सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या १६ महिला सुधारगृहातून पळून गेल्याची घटना शनिवारी चेंबूर येथे घडली आहे. या सर्व महिला गेल्या महिनाभरापासून याठिकाणी असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून याबाबत चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. शहरातील विविध बार आणि कुंटनखन्यातून सुटका करण्यात आलेल्या महिलांना सुधारण्यासाठी न्यायालायच्या आदेशाने या सुधारगृहामध्ये ठेवण्यात येते. त्यानुसार चेंबूरमधील कस्तुर्बा महिला सुधारगृहात गेल्या महिनाभरापासून ३७ महिला वास्तव्यास होत्या. श्निवारी रात्री आठच्या सुमारास जेवण आटोपल्यानंतर या महिला भांडी धुवण्याच्या बहाण्याने बाथरुच्या दिशेने गेल्या होत्या. मात्र बराच वेळ बाहेर न आल्याने येथील कर्मचारयांनी पहाणी केली असता यातील १७ महिला गायब झाल्या होत्या. कर्मचारयांनी तत्काळ परिसरात शोध घेताला असता यातील १६ महिला पळून जाण्यास यशस्वी ठरल्या, तर एका महिलेला पकडण्यात कर्मचारयांना यश आले आहे. ही बाब वरिष्ठ अधिकारयांना समजताच त्यांनी तत्काळ वसतीगृहात धाव घेतली. त्यानंतर ही बाब चेंबूर पोलिसांना सांगण्यात आली. त्यानुसार रात्री उशिरा चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.
बाथरुमच्या खिडकीतून चेंबूरच्या महिला सुधारगृहातून १६ महिलांचे पलायन
By admin | Published: July 03, 2016 10:09 PM