एकाची माघार : प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैधनागपूर : उमेदवारी अर्ज छाननीच्या प्रक्रियेत शहरातील सहा मतदारसंघातील एकूण १७ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले. यात काही अपक्ष आणि राजकीय पक्षांच्या ‘डमी’ उमेदवारांचा समावेश आहे. पूर्व नागपूरमधून एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला.विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची सोमवारी छाननी करण्यात आली. अर्जासोबत एबी फॉर्म न जोडणे, प्रतिज्ञापत्र अपूर्ण असणे आणि अर्जात देण्यात आलेली प्रस्ताविकांच्या नावाची संख्या कमी असणे किंवा ती मतदारसंघाच्या बाहेरची असणे, अर्ज चुकणे या कारणावरून सहा मतदारसंघातून एकूण १७ उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले. पूर्व नागपूरमधून कपिल आवारे यांनी माघार घेतली. १ आॅक्टोबरला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर निवडणूक रिंगणात किती उमेदवार राहतील, याचे चित्र स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)अर्ज रद्द झालेले उमेदवारदक्षिण - ईश्वर कडबे (बीएसपी डमी), क्षितिज राजपाल (रिपाइं), शारदा लांजेवार (अपक्ष),दक्षिण-पश्चिम - जितेंद्र म्हैसकर (बीएसपी डमी),पश्चिम- शेख मो. जमील मो. इब्राहिम (बीएसपी डमी), डॉ. दिलीप भगत (अपक्ष)पूर्व - राजेश देशभ्रतार, अर्चना कळसाईत (बागडे), पुरुषोत्तम कृ. हजारे, पुरुषोत्तम हटवारउत्तर - ज्योती जनबंधू (बीएसपी डमी), उमेश मेंढे (अपक्ष), जितेंद्र ससाणे (अपक्ष/सेना), अभिषेक शंभरकर, मोहनलाल चौहाणमध्य - शरद वंजारी, दीपराज पार्डीकर
१७ अर्ज बाद
By admin | Published: September 30, 2014 12:42 AM