शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

सरकारी शाळेत जाणाऱ्या १७ टक्के मुलांच्या घरात स्मार्टफोन नाहीत

By अतुल कुलकर्णी | Published: July 16, 2020 4:21 AM

स्मार्टफोन असणा-या पालकांपैकी ५९.८% कुटुंबांमध्ये स्मार्टफोन वापरता येतो अशी माहिती समोर आली आहे.

- अतुल कुलकर्णी 

मुंबई - सुरक्षिततेची खात्री करुन, डिजिटल सुविधा नसलेल्या/अपुऱ्या सुविधा असलेल्या भागात शाळांचे कामकाज लवकरात लवकरात सुरू करण्याचा प्रयत्न एससीईआरटी करत आहे. एका सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या माहितीनंतर आता गृह अध्ययन संचामधे टीव्ही (७०%) आणि फोन कॉल/एसएमएस (९०%) यासारखी विविध माध्यमे समाविष्ट केली जातील अशी माहिती एससीईआरटीचे संचालक दिनकर पाटील यांनी लोकमतला दिली. 

राज्यात ज्यांची मुले शाळेत शिक्षण घेत आहेत अशा १७% कुटुंबांमध्ये स्मार्टफोन, इंटरनेट, रेडिओ, टिव्ही सारख्या सुविधा उपलब्ध नाहीत. तर ९०% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या पालकांकडे फोन व वीजपुरवठा असल्याचे दिसून आले आहे. तर स्मार्टफोन असणाऱ्या पालकांपैकी ५९.८% कुटुंबांमध्ये स्मार्टफोन वापरता येतो अशी माहिती समोर आली आहे. स्मार्टफोन वापराच्या बाबतीत सामाजिक फरक स्पष्टपणे दिसून आला आहे. स्मार्टफोन वापराच्या बाबतीत ग्रामीण भागात ५६.८% पालक व शहरी भागात ७०.७% पालक स्मार्टफोनचा वापर करत आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील अधिक कुटुंबांना  स्मार्टफोन वापरता येतो. तर अनुसूचित जमातीच्या कुटुंबांमध्ये स्मार्टफोनचा वापर सर्वात कमी म्हणजे ४२.६%  व सर्वसाधारण सामाजिक गटांमध्ये स्मार्टफोन वापरण्याचे प्रमाण ७३.५%  इतके आहे. 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व युनिसेफ यांनी मिळून राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती देण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी विकसित केलेल्या गृह अध्ययन संचाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधी समजून घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांत सर्वेक्षण आले. दि. ११ व १२ जून या काळात संपूर्ण राज्यात एकाच वेळी हे सर्व्हेक्षण झाले. सर्वेक्षणातून  ३३०४ मुले व ३५५१ मुलींचे मूल्यांकन करण्यात आले. त्यापैकी १४४६ (२१%) विद्यार्थी शहरी भागातील व ५४०९ (७९%) विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याचे दिसून आले.

सर्वेक्षण झालेल्या विद्यार्थ्यांत १०७६ विद्यार्थी अनुसूचित जातीचे, ४१० विद्यार्थी अनुसूचित जमातीचे, १६३९ विद्यार्थी इतर मागास वर्गाचे, ७७५ विद्यार्थी भटक्या जमातीचे, ११६२ विद्यार्थी विमुक्त जातीचे आणि १७९३ विद्यार्थी सर्वसाधारण प्रवर्गाचे होते.   

मुला-मुलींमध्ये डिजिटल सामग्री द्वारे गृह अध्ययन संच वापराबाबतीत कोणताही लक्षणीय फरक नसला तरीही, शहरी व ग्रामीण, विशेष गरजा असणारी मुले, सामाजिक गट यानुसार लक्षणीय फरक आहे. - गृह अध्ययन संच वापरणाऱ्या मुलांच्या टक्केवारीत पुणे विभाग सर्वाधिक (६४.४%) व अमरावती विभाग सर्वांत कमी (३१.४%) आहे. 

सर्व्हेक्षणासाठी मुंबईसह ७२ तालुक्यातील एकूण ७६० शासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नमुना शाळांपैकी ७३७ शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. यात इयत्ता १ ली ते ८ वी मधील नियोजित ७६०० नमुना विद्यार्थ्यांपैकी ६८५५ विद्यार्थ्यांचे नेमून दिलेल्या सर्वेक्षकांमार्फत मूल्यांकन करून संपूर्ण राज्यातील जिल्हानिहाय गृह अध्ययन संच वापर स्थिती सांगण्यात आली होती. साक्षरता दरातील उच्चतम तालुका आणि निम्नत्तम तालुका या निकषांनुसार जिल्हानिहाय दोन तालुक्यांची निवड करून सदर तालुक्यांतील प्रत्येकी १० शाळा व त्यांतील एक इयत्ता यांची निवड केंद्रीय पध्दतीने करण्यात आली. शाळांतील विद्यार्थ्यांची निवड या एच्छिकरित्या जिल्हा स्तरावरुन करण्यात आली. सदर सर्वेक्षण केवळ शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये करण्यात आले आहे. यापुढील टप्प्यात खाजगी अनुदानित शाळा व खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

- १४४६। २१% विद्यार्थी शहरी भागातील-५४०९। ७९% विद्यार्थी ग्रामीण भागातील-  १०७६ अनुसूचित जाती- ४१० अनुसूचित जमाती- १६०९ इतर मागास वर्ग- ७७५ भटक्या जमाती-१६२ विमुक्त जाती- १७९३ सर्वसाधारण प्रवर्गसर्वेक्षणातून समोर आलेले काही मुद्दे

सर्व्हेक्षणातून समोर आलेले काही मुद्दे : - ७०% लोकांकडे टीव्ही आहे. - ६०% लोकांकडे इंटरनेटसह स्मार्टफोन आहे. - ४५% लोकांकडे रेडिओ आहे. - डेस्कटॉप आणि लॅपटॉप असणाऱ्यांची संख्या नगण्य. - नाशिक, नागपूर शिक्षण विभागात २०% पेक्षा अधिक लोकांकडे सुविधा नाहीत. - सद्यस्थितीत डिजिटल सामग्रीद्वारे ५०% मुले गृह अध्ययन संच वापरू शकतात.  स्मार्ट फोनचा वापर करणारे पालक- ५६.८%ग्रामीण भागात-७०.७% शहरी भागात- ४२.६%अनुसूचित जमाती- ७३.५%सर्वसाधारण सामाजिक गटसुरक्षिततेची खात्री करुन, डिजिटल सुविधा नसलेल्या/अपुºया सुविधा असलेल्या भागात शाळांचे कामकाज लवकरात लवकरात सुरू करण्याचा प्रयत्न एससीईआरटी करत आहे. एका सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनंतर आता गृह अध्ययन संचामधेटीव्ही (७०%) आणि फोन कॉल/एसएमएस (९०%) यासारखी विविध माध्यमे समाविष्ट केली जातील.- दिनकर पाटील,संचालक, एससीईआरटी

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीMobileमोबाइल