शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

राज्यातील १७ जागांसह देशभरातील ७१ मतदारसंघांमध्ये आज होणार मतदान!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 3:27 AM

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील १७ मतदारसंघांसह देशातील ७१ जागी सोमवारी (२९ एप्रिल) मतदान होईल. या टप्प्यात राज्यातील ३२३ उमेदवारांचे भवितव्य यंत्रांमध्ये बंद होईल

मुंबई/दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील १७ मतदारसंघांसह देशातील ७१ जागी सोमवारी (२९ एप्रिल) मतदान होईल. या टप्प्यात राज्यातील ३२३ उमेदवारांचे भवितव्य यंत्रांमध्ये बंद होईल. राज्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे (धुळे), मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा (दक्षिण मुंबई), भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पूनम महाजन (मुंबई उत्तर-मध्य) यांचा समावेश आहे. या टप्प्यासह राज्यातील निवडणुकीची सांगता होईल.

राजस्थान व उत्तर प्रदेशातील प्रत्येकी १३, प. बंगालमधील आठ, मध्य प्रदेश व ओडिशातील प्रत्येकी सहा, बिहारच्या पाच व झारखंडमधील तीन मतदारसंघांप्रमाणेच जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग मतदारसंघाच्या काही भागातही याच वेळी मतदान होईल. गेल्या वेळी भाजपला भरघोस यश दिलेल्या मध्य प्रदेश व राजस्थानमधील निवडणुकीस सोमवारी सुरुवात होईल. गेल्या निवडणुकीत या दोन्ही राज्यांत एकूण ५४ पैकी ५२ जागा भाजपने जिंकल्या होत्या. मात्र अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव होऊन तेथे काँग्रेसची सरकारे आली. याचे प्रतिबिंब या मतदानात किती पडते हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपसाठी महत्त्वाचा टप्पाचौथा टप्पा सत्ताधारी भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचा व कदाचित निर्णायक ठरू शकेल. २०१४ मध्ये या ७१ पैकी ५६ मतदारसंघांत एनडीएने विजय मिळविला होता. इतर जागा तृणमूल काँग्रेस (६) व बिजू जनता दल (६) काँग्रेस (२) आणि पीडीपी (१) यांच्या वाट्याला आल्या होत्या. भाजप असलेल्या जागा टिकवू शकेल का याचा फैसला या टप्प्यात होईल.

९ राज्ये ७१ जागाबिहार (५), झारखंड (३), मध्य प्रदेश (६), महाराष्ट्र (१७), ओडिशा (६), राजस्थान (१३), उत्तर प्रदेश (१३), पश्चिम बंगाल (८).जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग मतदारसंघात तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. त्याचा दुसरा टप्पा असेल. चार केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग, एस.एस. अहलुवालिया, सुभाष भामरे व बाबुल सुप्रियो या केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य सोमवारी यंत्रबंद होईल. दोन माजी मंत्री सलमान खुर्शीद व अधीर रंजन चौधरी हे काँग्रेसचे दोन माजी केंंद्रीय मंत्रीही रिंगणात आहेत.

लक्षणीय लढती कन्हैया कुमार (भाकप), बैजयंत पांडा (भाजप), डिंपल यादव (सप), शताब्दी रॉय (तृणमूल) हे या टप्प्यातील अन्य काही लक्षणीय उमेदवार आहेत.

राज्यातील १५ विद्यमान खासदारांची परीक्षाराज्यातील शेवटच्या चौथ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानात राज्यातील तब्बल १५ खासदार पंचवार्षिक परीक्षेला समोरे जात आहेत. त्यात डॉ. सुभाष भामरे, पूनम महाजन, गजानन कीर्तिकर, गोपाळ शेट्टी, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, कपिल पाटील, श्रीकांत शिंदे, राजेंद्र गावित, सदाशिव लोखंडे, राजन विचारे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव, हिना गावित व हेमंत गोडसे यांचा समावेश आहे.

सध्या कुठे आहे कुणाचा खासदारभाजप : नंदुरबार, धुळे, दिंडोरी, पालघर, भिवंडी, उत्तर मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबईशिवसेना : नाशिक, कल्याण, ठाणे, वायव्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, मावळ, शिरूर, शिर्डी, मुंबई, ठाणे, पालघरच्या उमेदवारांचे भवितव्य होणार यंत्रबंद

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019