शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

राज्यात ‘आयजी’ची 17 पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 6:29 AM

आस्थापना, प्रशासन यासारख्या महत्त्वाच्या जागेसह राज्यातील  या दर्जाची तब्बल १७ पदे रिक्त

- जमीर काझीमुंबई :  मुंबई : आयपीएस अधिकाऱ्यांधील दोन घटकांमध्ये  समन्वयकाची भूमिका बजावणाऱ्या विशेष पोलीस महानिरीक्षक/ सहआयुक्त (आयजीपी/जॉईट सीपी) पदाचा  गृहविभागाला जणू विसर पडला असल्याची परिस्थिती आहे. आस्थापना, प्रशासन यासारख्या महत्त्वाच्या जागेसह राज्यातील  या दर्जाची तब्बल १७ पदे रिक्त आहेत. एक तर त्याचा  अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडून किंवा पद अवनत किंवा पदावनत करून चालविला जात आहे. गेल्या अडीच वर्षांत या पदावर केवळ तीन अधिकाऱ्यांना बढती मिळाली आहे. पोलीस दलात आयजी दर्जाचा अधिकारी हा परिक्षेत्रातील ५, ६ जिल्हा, विभागावर निरीक्षण ठेवून त्याच्यात व  पोलीस मुख्यालयाशी समनव्यक म्हणून भूमिका बजावत असतो.सध्या राज्यात ४४ पदे मंजूर आहेत. काही अपवाद वगळता त्यापैकी केवळ ४,५ जागा या रिक्त राहत असतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून १७ पदे रिक्त किंवा अतिरिक्त कार्यभार देऊन चालविली जात आहेत. मे २०१९ नंतर केवळ तिघा डीआयजीचे या पदावर प्रमोशन करण्यात आले आहे. त्यापैकी एस. बी. तांबडे यांना निवृत्तीच्या दोन दिवसांपूर्वी बढती देण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्टमध्ये  जय जाधव यांना नवी मुंबईत  त्याठिकाणी,  तर अंकुश शिंदेना सोलापूरहून बढती देण्यात आली आहे. अनेक अधिकारी बढतीसाठी पात्र आहेत. ही प्रक्रिया अद्याप रखडली आहे.सध्या रिक्त, डाऊनग्रेड, अपग्रेड  करण्यात आलेली पदेआस्थापना, प्रशासन, एटीएस, पीओडब्लू, एएनओ, संचालक, एमआयए  अकादमी, सीआयडी इवोडब्लू आणि इस्टेब्लमेंट, एसारपीएफमधील दोन, व्हीआयपी सुरक्षा यांचा  अतिरिक्त कार्यभार दिला गेला आहे. त्याशिवाय एसआयडी, कोकण, एसआयडी, नांदेड, अमरावती,नाशिक याठिकाणी डीआयजीकडे पदभार देण्यात आला आहे, तर पीसीआर व मुंबईत आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेतील पद तात्पुरते अपडेट केले आहे. प्रलंबित  प्रमोशन व रिक्त पदाबाबत  विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून सूचना केली आहे. या महिनाअखेर हा प्रश्न मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न आहे.- दिलीप वळसे पाटील (गृहमंत्री)