ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 18 : पाच ते 15 लाखांर्पयतच्या वाहन खरेदीसाठी केवळ दहा टक्के रक्कम भरल्यास तीच वाहने एका नामांकित ट्रॅव्हल कंपनीला लावून अमाप पैसे मिळवून देण्याचे अमिष दाखवून ठाणे, मुंबईतील सुमारे 170 लोकांकडून सुमारे दोन कोटी रुपये उकळणा:या संतोष भावसार याला नौपाडा पोलिसांनी एक महिन्यापूर्वी अटक केली. त्याच्या साथीदाराचा शोध सुरु असून तो नेपाळमध्ये पसार झाल्याची शक्यता ठाणो पोलिसांनी वर्तविली आहे. त्यामुळे त्याला शोधण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणींना सामना करावा लागत असल्याची माहिती एका वरीष्ठ पोलीस अधिका:याने दिली.
डार्क हॉर्स टूर्स सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे अनेकांना गंडा घालणा:या संतोष भावसारविरोधात डॅनियल नाडर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर त्याला 17 जुलै रोजी नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्याच्या अमित शर्मा (नाव बदलले आहे) या साथीदाराचा शोध घेण्यासाठी दोन वेगवेगळी पथकेही नेमली. अमितला शोधण्यासाठी परदेशात जाण्याची परवानगी मिळविण्यापासून ते तिकडच्या स्थानिक पोलिसांची मदत घेण्यार्पयत सर्व मार्गाचा अवलंब केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. राजस्थानमधील डार्क हॉर्स टूर्स सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड या नावाने भावसारने ठाण्याच्या नौपाडा भागात कार्यालय सुरु केले होते.
वेगवेगळ्या किंमतीची वाहने विकत घेण्यासाठी आणि घेतलेल्या वाहनांना ट्रॅव्हल्स कंपनीत व्यवसाय मिळवून देण्याच्या आकर्षक योजनाही त्याने ग्राहकांना दाखविल्या. गाडीच्या किंमतीच्या दराप्रमाणो तिच्या खरेदीसाठी केवळ दहा टक्के डाऊन पेमेंटची रक्कम भरायची. म्हणजे पाच लाखांच्या वाहनाला 50 हजार, 9 लाखांच्या वाहनाला 90 हजार तर महागडय़ा गाडीला पाच लाखांची रक्कम भरण्याची योजना त्याने सुरु केली. कागदपत्रंच्या पूर्ततेनंतर ती वाहने डार्क हॉर्स टूर्स सोल्यूशन प्रा. लि. या कंपनीसाठीच भाडे तत्त्वावर लावण्याचे प्रलोभनही त्याने दाखविले. त्यामुळे अवघ्या 20 दिवसांतच त्याच्याकडे 150 ते 200 जणांनी वाहनांचे डाऊन पेमेंट भरण्यासाठी गुंतवणूक केली. यातून अनेकांची फसवणूक झाल्याचे उघड झाल्यानंतर नाडर यांच्यासह अनेकांनी तक्रारी केल्यानंतर हा तपास पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या आदेशाने नौपाडा पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
याप्रकरणी संतोष भावसारला यापूर्वीच अटक केली आहे. त्याच्या साथीदारालाही येत्या काही दिवसांत अटक करण्यात येईल. संदीप भाजीभाकरे, उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे शहर