शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

बहादूरगडावर सापडले १७व्या शतकातील शिल्प

By admin | Published: November 04, 2015 2:24 AM

अहमदनगर येथील बहादूर गडावरील खजिना शोधण्यासाठी आलेल्या चोरट्यांना एका बौद्ध भिक्षूंचे लाकडी शिल्प सापडले. त्यांनी हे शिल्प तेथील झाडीत फेकून दिले. परंतु, गडप्रेमींनी हे शिल्प

पुणे : अहमदनगर येथील बहादूर गडावरील खजिना शोधण्यासाठी आलेल्या चोरट्यांना एका बौद्ध भिक्षूंचे लाकडी शिल्प सापडले. त्यांनी हे शिल्प तेथील झाडीत फेकून दिले. परंतु, गडप्रेमींनी हे शिल्प राज्याच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपविले असून तज्ज्ञांकडून त्याचा अभ्यास केला जात आहे. ज्येष्ठ मूर्ती अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी हे शिल्प सतराव्या किंवा अठराव्या शतकातील चिनी कलाकृती असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे.देगलूरकर म्हणाले, अहमदनगर येथील पेडगाव आता बहादूरगड या नावाने ओळखले जाते. या किल्ल्याचा सरदार बहादूर खान हा औरंगजेबाचा नातेवाईक होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला पळवून लावले. त्याकाळात किल्ल्यावर लाकडी वाडे होते. याच वाड्यातील हे शिल्प असावे. कमानीकृती भुवयांतून पुढे आलेले नाक, मोठ्या पापण्या आणि मोठे कान यावरून हे शिल्प चिनी असावे, असे वाटते.पुरातत्त्व विभागाचे पुणे विभागीय सहाय्यक संचालक विलास वाहणे म्हणाले, प्रथम दर्शनी हे शिल्प तिबेटीयन किंवा चिनी बनावटीचे दिसून येते. मात्र, त्याचा सखोल अभ्यास व्हावा यासाठी आम्ही डेक्कन कॉलेजमधील अभ्यासक श्रीकांत गणवीर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मुंबई येथील लाकडी शिल्पाच्या तज्ज्ञ अभ्यासकांकडून मूर्ती संदर्भातील माहिती जाणून घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आम्ही पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. (प्रतिनिधी)