शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

विहिरीचा स्लॅब कोसळून १८ मजूर जखमी

By admin | Published: September 23, 2014 1:05 AM

पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवर टाकण्यात येणारा स्लॅब कोसळून १८ मजूर गंभीर जखमी झाले. ही घटना आर्णी तालुक्यातील तरोडा येथे सोमवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.

तरोडाची घटना : जलस्वराज्य अंतर्गत पाणीपुरवठ्याची विहीरहिवरी/जवळा (यवतमाळ) : पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवर टाकण्यात येणारा स्लॅब कोसळून १८ मजूर गंभीर जखमी झाले. ही घटना आर्णी तालुक्यातील तरोडा येथे सोमवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. जखमींना यवतमाळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.आर्णी तालुक्यातील जवळा येथे जलस्वराज्य योजनेंतर्गत अडाण नदीच्या तीरावर विहीर खोदण्यात आली. या विहिरीवर स्लॅब टाकण्याचे काम सोमवारी सुरू होते. मात्र ४.३० वाजताच्या सुमारास अचानक स्लॅब कोसळला. त्यासोबत स्लॅबवर असलेले मजूरही विहिरीत कोसळले. जखमींमध्ये कंत्राटदार सुनील उत्तमसा समदूरकर (४०), रवी ज्ञानेश्वर आत्राम (३६), भीमराव गाडेकर (५०), विष्णू जुगनाके (३५) सर्व रा.यवतमाळ, सुनील विठ्ठल मानकर (२७), चैतन्य अशोक वंजारी (२७) दोघेही रा.तरोडा, गजानन गोपाळ उईके (२३), गणेश वासुदेव इनवते (२८) दोघेही रा.मांगुळ यांच्यासह रघुनाथ राजाराम लोखंडे, संजय पांडुरंग मानकर, नरेश पंजाब मुनेश्वर, विशाल डोमाजी डांगे, गणेश महादेव आठवले, मंगेश भीमराव उईके, संजीव मानकर, राजीव आडे, विमलबाई तांबे, नभो गणेवार यांचा समावेश आहे. बहुतांश मजुरांच्या पायाला, छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली.घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन विहिरीत पडलेल्या मजुरांना बाहेर काढले आणि उपचारासाठी यवतमाळला रवाना केले.या विहिरीचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. यावर स्लॅब टाकण्यासाठी चार महिन्यांपूर्वीच सेंट्रिंग करण्यात आले होते. त्यानंतर दोनदा अडाण नदीला पूरही आला. सोमवारी स्लॅब टाकताना कोणतीही खातरजमा न करता शाखा अभियंता आणि कंत्राटदाराच्या उपस्थितीत कामाला सुरुवात केली, अशी माहिती आहे. विशेष म्हणजे ४ वाजताच्या दरम्यान मजुरांनी आजचे काम पूर्ण झाले, असे म्हणत काम थांबविले होते. परंतु अभियंता व कंत्राटदाराने त्यांना पुन्हा काम करायला लावले. त्यामुळे स्लॅबचे वजन अधिक होऊन संपूर्ण स्लॅबच विहिरीत कोसळला. (वार्ताहर)