- दयानंद पाईकराव, नागपूरमध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पाण्याची बचत करण्यात महाराष्ट्रात आघाडी मिळविली असून, पाण्याचा पुनर्वापर करून २००३ ते २०१६ या कालावधीत १८० कोटी लीटर पाण्याची म्हणजे जवळपास ३.५० कोटी रुपयांची बचत केली आहे. रेल्वेच्या इतर विभागात, तसेच एसटी महामंडळ आणि खासगी उद्योगात असाच पाण्याचा पुनर्वापर केल्यास महाराष्ट्रातील जलसंकट दूर होण्यास मदत होऊ शकेल.रेल्वे विभागात गाड्या-प्लॅटफॉर्म धुणे, रेल्वे रुळाची स्वच्छता यासाठी दररोज हजारो लीटर पाण्याची नासाडी होते, परंतु मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पाण्याचे महत्त्व ओळखून नागपूर विभागात नाल्यातून वाहणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा २००३ मध्ये पुनर्वापर सुरू केला. त्यासाठी २८.४८ लाखांचा प्रकल्प नागपुरात उभारला. त्यात दररोज ६ लाख लीटर पाण्याचे शुद्धिकरण करण्याची क्षमता आहे. सध्या मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ४ लाख लीटर पाण्याचे म्हणजे महिन्याकाठी १.२० कोटी लीटर पाण्याचे शुद्धिकरण होते.२००३ - २०१६ या कालावधीत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने जवळपास १८० कोटी लीटरच्या पाण्याचे शुद्धिकरण करून त्याचा पुनर्वापर केला. रेल्वेने एवढे पाणी महापालिकेकडून विकत घेतले असते, तर त्यांना तब्बल ३.५० कोटी रुपये मोजावे लागले असते.सध्या महाराष्ट्रात पाण्याची भीषण टंचाई पाहता, अशा प्रकारे पाण्याचा पुनर्वापर केल्याने एक प्रकारे पाण्याची बचतच होत आहे. आम्ही आणखी अशाच प्रकारचे जलशुद्धिकरण केंद्र बल्लारशा येथे सुरू करणार आहोत. या प्रकल्पाची क्षमता सहा लाख लीटर प्रतिदिन राहणार आहे. या शिवाय नागपुरातील प्रकल्पाची क्षमता एक लाख लीटरने वाढविण्याचा विचार सुरू आहे.- प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे नागपूर विभाग
१८० कोेटी लीटर पाण्याची बचत
By admin | Published: April 03, 2016 3:51 AM